व्हॅलेंटाईन डेसाठी कुटुंबीयांना न सांगता 'ते' गोव्याला गेले पण परतलेच नाहीत, झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 02:23 PM2023-02-15T14:23:04+5:302023-02-15T14:32:43+5:30

कुटुंबियांना न सांगता व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गोव्यात पोहोचलेल्या जोडप्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे.

couple goa celebrate valentine day without informing their family drowned in the sea | व्हॅलेंटाईन डेसाठी कुटुंबीयांना न सांगता 'ते' गोव्याला गेले पण परतलेच नाहीत, झालं असं काही...

व्हॅलेंटाईन डेसाठी कुटुंबीयांना न सांगता 'ते' गोव्याला गेले पण परतलेच नाहीत, झालं असं काही...

Next

कुटुंबीयांना न सांगता व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी गोव्यात पोहोचलेल्या जोडप्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू झाला. मृत मुलगा आणि मुलगी मूळचे उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील पालोलेम बीचवर ही घटना घडली असून या कपलचा बुडून मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जीवरक्षकांच्या मदतीने या कपलला किनाऱ्यावर आणले आणि दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. सुप्रिया दुबे (26) आणि विभू शर्मा (27) अशी मृतांची नावे आहेत.

दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून काही दिवसांपूर्वी ते गोव्यात आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या सुप्रिया बंगळुरूमध्ये तर विभू दिल्लीत राहत होता. सोमवारी रात्री बीचवर काही लोकांना हे दोघे फिरताना दिसले. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचंही सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, ते गोव्याला गेल्याची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना नव्हती. विभू शर्मा हा व्यवसायाने ब्लॉगर असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: couple goa celebrate valentine day without informing their family drowned in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.