हॉटेलमध्ये प्रेमी जोडप्यांचे सुरु होते अश्लील चाळे, आक्षेपार्ह स्थितीत पोलिसांनी केली अटक
By पूनम अपराज | Published: December 31, 2020 08:56 PM2020-12-31T20:56:01+5:302020-12-31T20:56:33+5:30
Crime News : पोलिसांनी प्रेमी जोडप्यांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतलं असून असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
मेरठ जनपदमधील मोदीपुरम परिसरातील रुडकी रोडवरील एका हॉटेलमध्ये बुधवारी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी छापेमारीत १७ तरुणी-तरुणांना ताब्यात घेतले आहे. नववर्षाच्या पार्टीच्या आड प्रेमी जोडप्यांचा अश्लील चाळे सुरू होते. पोलिसांनी प्रेमी जोडप्यांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतलं असून असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
शांती निकेतन कॉलनीच्या आत हॉटेलमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार हॉटेलात उघडकीस आला. कॉलनीतील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. हॉटेल सजवलेले होते आणि पार्टीच्या नावाखाली हॉटेलमध्ये गैरकाम सुरू होतं. पोलिसांनी छापा टाकत हॉटेलमधील खोल्यांचा तपास केला. येथे अनेक जोडपे आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी १० तरुण आणि ७ तरुणींना ताब्यात घेतलं आहे.
हॉटेलच्या खोलीत दारुच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. यातील काही तरुण मद्यपान केलेले होते. कॉलनीतील लोकांनी मालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. हॉटेलमध्ये सापडलेले प्रेमी जोडपी वयस्क आहेत. या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करीत आहे. सर्वांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असं पोलीस ठाण्याचे प्रभारी दिग्विजय नाथ शाही यांनी सांगितलं आहे, अशी माहिती अमर उजालाने दिली आहे.