खेळण्यातली बंदूक घेऊन ज्वेलरी शोरूम लुटायला गेले होते पती-पत्नी आणि मग पुढे झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 01:12 PM2021-06-30T13:12:17+5:302021-06-30T13:15:57+5:30
दोघेही दुपारच्यावेळी एका ज्वेलरी दुकानात चोरी करण्यासाठी गेले. पत्नीच्या हाता हातोडी होती आणि तर पतीच्या हातात खेळण्यातील बंदूक होती.
कोरोना महामारीमुळे अनेकांचे उद्योग बंद पडल्याने पती-पत्नीला साऊथचा एक सिनेमा पाहून चोरी करण्याची आयडिया आली. दोघांनीही फिल्मी स्टाइल ज्वेलरीचं दुकान लुटण्याचा प्लॅन केला. हे दुकान लुटण्यासाठी दोघांनी खेळण्यातील बंदूक खरेदी केली. सगळं काही प्लॅननुसार होत होतं, पण ते दोघे चोरी करत असतानाच त्याचं गुपित उघड झालं.
अहमदाबादच्या कृष्णानगर भागात ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना पकडले गेल्यावर पती-पत्नी म्हणाले की, कोरोनामुळे दोघांची नोकरी गेली. घरातील आर्थिक स्थिती बिकट झाली होती. काय करावं काही कळत नव्हतं. अशात त्यांनी एक साऊथचा सिनेमा बघून चोरी करण्याचा प्लॅन केला. (हे पण वाचा : लग्नाच्या दिवशीच बॉयफ्रेन्डसोबत पळून गेली नवरी, पोलीस स्टेशनमध्ये रडत बसला नवरदेव)
दोघेही दुपारच्यावेळी एका ज्वेलरी दुकानात चोरी करण्यासाठी गेले. पत्नीच्या हाता हातोडी होती आणि तर पतीच्या हातात खेळण्यातील बंदूक होती. दुकानात शिरल्यावर त्यांनी स्टाफला धमकावणं सुरू केलं. दुकानातील स्टाफही भर दुपारी घडत असलेल्या या घटनेने घाबरले होते. (हे पण वाचा : रेपिस्ट पतीची हत्या करून मुलांसोबत मृतदेहाची लावली होती विल्हेवाट, तरी महिलेची कोर्टाने शिक्षा केली माफ)
मात्र, कामगारांनी बहादुरी दाखवत हा चोरीचा प्लॅन हाणून पाडला. तेव्हाच दाम्पत्याचं गुपित उघड झालं. त्यानंतर दोघेही माफी मागत होते. त्यानंतर चोरीची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहो़चले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. पतीचं नाव भरत गोयल आणि पत्नीचं नाव योगिता आहे. पोलिसांनी सांगितलं की, भरत गोयल शिवणकाम करत होता, पण कोरोनामुळे व्यापार बंद झाला. त्यामुळे त्यांच्याकडे घर चालवण्यासाठी पैसे नव्हते.
दरम्यान त्यांनी टीव्हीवर एक सिनेमा पाहिला आणि त्यातूनच त्यांना चोरी करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलं. बाजारातून खेळण्यातील बंदूक आणली आणि एक नकली हातोडीही आणली. पकडले गेल्यावर दोघेही आपली मजबुरी सांगत सोडण्याची विनंती करत होते. पोलीस म्हणाले की, पती-पत्नी विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.