अतिथी म्हणून ज्यांना जेवू घातलं, त्यांनीच दाम्पत्याला लुटलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:39 PM2021-01-30T17:39:13+5:302021-01-30T17:49:07+5:30

Jalgaon : नशिराबाद येथे हा प्रकार उघडकीस आला असून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The couple was robbed by those who served food as guests in Jalgaon | अतिथी म्हणून ज्यांना जेवू घातलं, त्यांनीच दाम्पत्याला लुटलं...

अतिथी म्हणून ज्यांना जेवू घातलं, त्यांनीच दाम्पत्याला लुटलं...

Next
ठळक मुद्देदाम्पत्याला संमोहित केले आणि घरातील ३० हजार रुपये रोख व इतर सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९९ हजार ८२१ रुपयांचा ऐवज घेऊन या महिला पसार झाल्या.

जळगाव : तूप विक्री करुन दमलेल्या दोन महिलांनी एका दाम्पत्याकडे दोन घास जेवायला मागितले. अतिथी देव भव..प्रमाणे दाम्पत्याने त्यांना तृप्त होईपर्यंत प्रेमाने जेवू घातले. नंतर त्यांनीच डोळ्यांच्या सहाय्याने दाम्पत्याला संमोहित केले आणि घरातील ३० हजार रुपये रोख व इतर सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९९ हजार ८२१ रुपयांचा ऐवज घेऊन या महिला पसार झाल्या. यात विशेष म्हणजे, हे दाम्पत्या या महिलांना सोडण्यासाठी महामार्गापर्यंत आले. नशिराबाद येथे हा प्रकार उघडकीस आला असून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बारसू तेली (वय ५६) हे पत्नी शकुंतला हे दाम्पत्य नशिराबाद येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळच  वास्तव्य करतात. त्यांच्याकडे २८ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन महिला शुद्ध तूप घ्या, असे सांगत विचारपूस करत होत्या. दोनशे रूपये किलोच्या भावाने तूप खरेदी करा असा आग्रह करीत त्यांनी प्यायला पाणी मागितले. त्यानंतर घरात शिरकाव करुन दोन घास जेवायला मिळेल का? अशी विचारणा केली. दाम्पत्यानेही घरी आलेल्या पाहुण्यांचा आदरतिथ्य केलेच पाहिजे या हेतून त्यांना जेवण दिले. 

दोन्ही अनोळखी महिलांनी शकुंतला तेली यांना डोळ्यांच्या साह्याने संमोहित केले. शकुंतला तेली यांनी त्यांना घरातून प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची साडे तीन तोळा वजनाची अंगठी तर दोन सोन्याच्या वेली जोडी मिळून दहा ग्रॅम दागिने व ३० हजार रुपये रोख असा तब्बल एक लाख ९९ हजार ८२१ रुपयांचे दागिने व रक्कम त्या दोघा महिलांना काढून दिली, इतकेच नव्हे तर दोघी महिलांना महामार्गावर तरसोद फाट्यापर्यंत सोडायला सुद्धा दाम्पत्य गेले.

घरी आल्यावर उघड झाला प्रकार
या महिलांना सोडून घरी आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे दाम्पत्याच्या लक्षात आले तोपर्यंत त्या महिला दागिने व रक्कम घेऊन पसार झाल्या होत्या.
 

Web Title: The couple was robbed by those who served food as guests in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.