मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आईला शाळेकडून ४ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 06:00 PM2017-11-09T18:00:18+5:302017-11-09T18:09:07+5:30

शाळेमुळे मुलीने आत्महत्या केल्याचा दावा आईने कोर्टासमोर केला आहे.

court given settelment of 4 crores to mother in daughter's suiside | मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आईला शाळेकडून ४ कोटींची भरपाई

मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आईला शाळेकडून ४ कोटींची भरपाई

Next
ठळक मुद्देया प्रकारानंतर तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली.न्यायालयाने शाळेवर अब्रुनुकसानीचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा केलाय.याआधीही त्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे आईने सांगितले.

न्यूयॉर्क : मुलीने आत्महत्या केली म्हणून पीडित आईला न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन  सुप्रिम कोर्टाने तब्बल ४ कोटी ८६ लाख ८४ हजार ३७५ रुपयांची (७५ लाख डॉलर)ची भरपाई केली आहे. शाळेवर अब्रुनुकसानीचा आणि आत्महत्येस प्रवुत्त केल्याचा दावा करत पीडित आईने न्यायालयाकडून न्याय मिळवला आहे. 

ओमोटायो अॅडिओ ही विद्यार्थीनी शाळेत २०१४ साली प्रश्नमंजुषेची परिक्षा देत होती. त्यावेळी ती मोबाईल वापरत असल्याचे तिच्या शिक्षिकेच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला. वर्गात आपली नाचक्की झाली असं समजून त्या मुलीने बाथरुमला जाते म्हणून वर्गातून पळ काढला आणि नंतर ती परत आलीच नाही. तिने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहून ठेवली होती, ‘मी काय करतेय? मी हे का करतेय? हे करणारी मी नाही. या वायफळ  प्रश्नमंजुषेमुळे माझी नाचक्की झाली. मला आता सगळ्यांहून लांब जायचंय. अगदी नदीच्या काठाशी.’ असं तिने तिच्या उत्तरपत्रिकेच्या मागच्या बाजूला लिहून ठेवलं होतं. त्यानंतर तिने थेट न्यूयॉर्कच्या हूडसन नदीत उडी मारली. तिला पोहता येत नव्हतं. त्यामुळे नदीच्या प्रवाहात ती वाहत गेली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. 

या प्रकारानंतर तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल करून नुकसान भरपाई म्हणून १० मिलिअन डॉलरची मागणी केली. वर्गात सगळ्यांसमोर नाचक्की करून तिला लाज वाटेल अशी वर्तवणूक शिक्षिकेने केल्यामुळेच ओमोटायोने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या तक्रारीत नमुद होतं. चालू परिक्षेत विद्यार्थीनी शाळेच्या बाहेर जात असतानाही तिला अडवण्यात का आलं नाही? असा युक्तीवाद करत न्यायालयाने शाळेवर अब्रुनुकसानीचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा केलाय. तसंच ओमोटायोने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शाळेतील शिक्षिकांनी तिच्याशी असं वागण्याआधी विचार करायला हवा होता. त्यामुळे मॅनहॅटन न्यायालयातील जेम्स दी ऑगस्टी यांनी त्या आईला शाळेकडून ७५ लाख डॉलरची भरपाई करून दिली.

Web Title: court given settelment of 4 crores to mother in daughter's suiside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.