शिजानच्या जामिनावर आज काेर्टात सुनावणी; बेल होणार की जेलच कायम राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 07:33 AM2023-02-27T07:33:56+5:302023-02-27T07:34:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  नालासोपारा : टीव्ही मालिका ‘अली बाबा : दास्तान -ए-काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनीषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा ...

Court hearing on Shijan's bail today; Will bail or jail remain? | शिजानच्या जामिनावर आज काेर्टात सुनावणी; बेल होणार की जेलच कायम राहणार?

शिजानच्या जामिनावर आज काेर्टात सुनावणी; बेल होणार की जेलच कायम राहणार?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : टीव्ही मालिका ‘अली बाबा : दास्तान -ए-काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनीषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा माजी प्रियकर आणि सहकलाकार शिजान खान दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे. सोमवारी होणाऱ्या जामिनाच्या सुनावणीत शिजानला जामीन मिळणार की कोठडी वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

शिजानला जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात शिजानने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र तेथून याचिका मागे घेत सुटकेसाठी वसई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आत्महत्या प्रकरणात शिजान खानच्या जामिनाबाबत शुक्रवारी  सुनावणी पुढे ढकलली होती. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दोन्ही बाजूचे म्हणणे वसई न्यायालय ऐकून 
घेणार असून सोमवारीच किंवा मंगळवारी शिजानच्या जामिनाचा निर्णय होईल.

शिजानविरुद्ध ५२४ पानांचे आरोपपत्र
अलीकडेच वालीव पोलिसांनी शिजान खानविरुद्ध ५२४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लागू केलेल्या कलमांतर्गत शिक्षेमध्ये दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Web Title: Court hearing on Shijan's bail today; Will bail or jail remain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.