भाजपा आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:37 PM2019-09-11T18:37:12+5:302019-09-11T21:19:23+5:30

आमदार ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ.विजप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

Court order to file a case against BJP MLA Sangeeta Thombre and her husband | भाजपा आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

भाजपा आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देबनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी फसवणूक प्रकरण

केज (बीड ) : लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी प्रकरणात कथीत संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार केज न्यायालयाने सूतगिरणीचे चेअरमन डॉ.विजप्रकाश ठोंबरे, आमदार संगिता ठोंबरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आज केज न्यायालयाने दिले आहेत.

सूतगिरणीचे संचालक गणपती कांबळे यांनी त्या संबंधित तक्रार केज न्यायालयात दाखल करून सूतगिरणीचे चेअरमन विजय प्रकाश ठोंबरे व केज च्या आमदार संगिता ठोंबरे यांच्या विरोधात ४२० , ४६७, ४६८, ४७१ गुन्हे दाखल करण्याचे मा. न्यायालयाने १५६ /३ अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी करून चार्जशीट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर गैर व्यवहारात आपल्या खोट्या सह्या चेअरमन व केजच्या आमदार यांनी करून शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्यात आले आहे. सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्या दाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा श्रीमती आश्विनी पवार फॉरेन्सिक तज्ञाचा अहवाल व शपथ पत्र जोडून सूतगिरणीचे चेअरमन व आमदार यांच्या वरती १५३/३ नुसार गुन्हा दाखल करून चौकशी करावी व चार्जशीट दाखल करण्याचे आदेश केज प्रथम वर्ग न्यायालयाने दिले..

न्यायालयाच्या आदेशानुसार आ. संगीता ठोंबरे व चेअरमन विजयप्रकाश ठोंबरे यांच्या वर ४२०, ४६७, ४६८, ४७१ कलमा नुसार बनावट दस्तऐवज तयार करून ते माहिती असतानाही खरे दाखवून फसवणूक केली असल्याचा गुन्हे दाखल करून चौकशी करून न्यायालयात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अँड संतोष मुंडे यांनी दिली आहे.

न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास : संगीता ठोंबरे
मला विरोध करण्यासाठी राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करून व निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे.  यापूर्वीही सूतगिरणी विरोधात अनेक तक्र ारी उच्च न्यायालय व वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर यांच्याकडे काही लोकांनी केलेल्या होत्या. त्या तक्र ारी उच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या. तसेच दाखल केलेल्या तक्र ारीसंदर्भात  आयुक्त (वस्त्रोद्योग नागपूर) यांनी त्यांच्या अहवालात या सूतगिरणीत कसल्याही प्रकारचे आर्थिक व इतर गैरव्यवहार झाले नसल्याचे नमूद केलेले आहे. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. 
-- संगीता ठोंबरे, आमदार, केज विधानसभा मतदारसंघ

Web Title: Court order to file a case against BJP MLA Sangeeta Thombre and her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.