Crime News: तुला शरीर सुख द्यायचे नसेल तर दुसरी तरुणी आणून दे; अमरावतीत न्यायालयाच्या प्रकल्प संचालकाची धक्कादायक मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 10:14 PM2021-07-17T22:14:30+5:302021-07-17T22:20:04+5:30
Crime News of Amravati: लवाद न्यायालयाच्या प्रकल्प संचालकावर विनयभंगाचा गुन्हा आरोपीने नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून जनसंपर्क अधिकारी पदावर काम करण्यासाठी आदेशपत्र दिले नाही. विना आदेशाने ती हजर झाली असता, त्याने पोलीस चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी केली.
अमरावती : नोकरीचे आमिष दाखवून एका प्रकल्प संचालकाने एका महिलेला शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तुला जर शरीर सुख द्यायचे नसेल तर एखादी तरुणी आणून दे, असे आरोपीने महिलेस म्हटल्याची धक्कादायक घटना पंचवटी चौकातील लवाद न्यायालयात घडली आहे. (court project director demand sex who came on Job in Court.)
पीडित महिलेने शनिवारी गाडगे नगर पोलिसात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी लवाद न्यायालयाचा प्रकल्प संचालक सिद्धार्थ विश्वनाथ रामटेके (३८ रा. पंचशील चौक) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. महिलेने आरोप केला आहे की, आरोपीने नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून जनसंपर्क अधिकारी पदावर काम करण्यासाठी आदेशपत्र दिले नाही. विना आदेशाने ती हजर झाली असता, त्याने पोलीस चारित्र्य प्रमाणपत्राची मागणी केली; परंतु महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल असल्यामुळे ते प्रमाणपत्र देऊ शकत नाही, असे महिलेने म्हटले.
त्यावेळी आरोपीने हात पकडून कक्षात नेले आणि आरोपीने शरीर सुखाची मागणी केली. असे तक्रारीत नमूद आहे. या जॉबसाठी तिला मासिक १५ हजार मिळणार होते. आरोपीविरुद्ध कलम ३५४, ५०६ नुसार गुन्हा नोंदविला.