आसारामची जन्मठेपेच्या शिक्षेविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 09:32 PM2019-09-23T21:32:17+5:302019-09-23T21:33:46+5:30
जोधपूर कोर्टाने ही याचिका फेटाळली.
जोधपूर - स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरु आसारामने जोधपूर कोर्टात त्याला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली असून कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. आसारामचे वकील शिरीष गुप्ते आणि प्रदीप चौधरी यांनी युक्तिवाद करताना कोर्टात सांगितले की, पीडित ही अल्पवयीन नसून आसारामला पॉक्सो कायद्यातील तरतुदीप्रमाणे पॉक्सो कायद्यानुसार दोषी ठरविले नाही पाहिजे. मात्र, जोधपूर कोर्टाने ही याचिका फेटाळली.
अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणात दोषी ठरलेला अध्यात्मिक गुरु आसारामला जोधपूर न्यायालयाने २०१८ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना प्रत्येकी २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले. तर आसाराम पुत्र नारायणसाई दोषी ठरविण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.
२०१३ मध्ये शाहजहांपूरच्या १६ वर्षाच्या मुलीने आसाराम याच्यावर जोधपूर आश्रममध्ये बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून आसाराम जेलमध्ये आहे. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी पोलिसांनी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आसारामविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस अर्थात अल्पवयीन न्याय आणि भा. दं. वि.च्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Jodhpur High Court dismisses self-styled godman Asaram Bapu plea for suspension of sentence imposed on him for raping a minor girl. (file pic) pic.twitter.com/k9sPAlxR1g
— ANI (@ANI) September 23, 2019