माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्येप्रकरणी इम्रान मेहंदीसह आठ आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:16 IST2018-08-27T16:13:59+5:302018-08-27T16:16:31+5:30
माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात इम्रान मेहंदीसह आठ आरोपींना न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्येप्रकरणी इम्रान मेहंदीसह आठ आरोपींना जन्मठेप
औरंगाबाद : माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात इम्रान मेहंदीसह आठ आरोपींना न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदी याने माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांचे वर्चस्वाच्या वादातून अपहरण केले. यानंतर साथीदाराच्या मदतीने त्याने कुरेशी यांना जिवंत पुरल्याची घटना मार्च-२०१२ साली घडली होती. यानंतर सुपारी किलर मेहंदी आणि त्याच्या टोळीने अनेक हत्या केल्याचे उघडकीस आले. आज सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी मेहंदी आणि त्याचासह ८ आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.