मालवणी ISIS प्रकरणात दोन आरोपींना कोर्टाने सुनावली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 06:53 PM2022-01-07T18:53:19+5:302022-01-07T18:54:01+5:30
Malvani ISIS Case : मुस्लिम तरुणांना इस्लामिक स्टेट (ISIS) मध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मालवणी ISIS प्रकरणातील आरोपी रिजवान अहमद आणि मोहसीन सय्यद यांना मुंबईन्यायालयाने UAPA कायद्याच्या कलम 20 अंतर्गत 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास त्यांची शिक्षा 3 महिन्यांनी वाढवली जाईल.
मुस्लिम तरुणांना इस्लामिक स्टेट (ISIS) मध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी या तरुणांना भारतातील सहयोगी राष्ट्रांविरुद्ध युद्ध करण्यासाठी IS/ISIL/ISISचे सदस्य होण्यासाठी परदेशात प्रवास करण्यास प्रवृत्त केले होते. हा गुन्हा मूळ काळाचौकीच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३० डिसेंबर २०१५ रोजी नोंदवला होता. त्यानंतर एनआयएने १८ मार्च २०१६ रोजी त्याची पुन्हा नोंद केली. नंतर तपास पूर्ण झाल्यानंतर एनआयएने १८ जुलै २०१६ आरोपपत्र दाखल केले होते.
Malvani ISIS case | Accused Rizwan Ahmed & Mohsin Sayed sentenced to imprisonment for 8 yrs under section 20 of Unlawful Activities (Prevention) Act by a Mumbai court. A fine of Rs 10,000 each imposed on them. If the fine is not paid, their punishment will be extended by 3 months pic.twitter.com/wGR0b2mk0L
— ANI (@ANI) January 7, 2022
रिजवान अहमद आणि मोहसीन इब्राहिम सय्यद यांनी मालवणी भागातील असुरक्षित मुस्लिम तरुणांना भडकवले, धमकावले आणि प्रवृत्त केले असल्याचं तपासात उघड झालं होतं. काल, बुधवारी एनआयए विशेष न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं. आज आरोपींच्या शिक्षेसंदर्भातील सुनावणी पार पडली आहे.