रेणू शर्माला कोर्टाचा दणका, ब्लॅकमेलिंग, खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 09:39 PM2022-04-24T21:39:03+5:302022-04-24T21:39:36+5:30

Renu Sharma : धनंजय मुंडे यांना 5 कोटी रुपये नगदी व 5 कोटी रुपयांचे दुकान घेऊन द्या नाहीतर केस करून व सोशल मीडियावरून बदनामी करेन, असे धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली होती.

Court slaps Renu Sharma, blackmailing, ransom case: Police remand extended | रेणू शर्माला कोर्टाचा दणका, ब्लॅकमेलिंग, खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत वाढ

रेणू शर्माला कोर्टाचा दणका, ब्लॅकमेलिंग, खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत वाढ

googlenewsNext

मुंबई  - हनी ट्रॅप त्यातून अनेकांना ब्लॅकमेलिंग आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कथित रेणू शर्मा या महिलेच्या पोलीस कोठडीत मुंबई न्यायायलाने आज आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धनंजय मुंडे यांना 5 कोटी रुपये नगदी व 5 कोटी रुपयांचे दुकान घेऊन द्या नाहीतर केस करून व सोशल मीडियावरून बदनामी करेन, असे धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मुंबई पोलिसात तक्रार दिली होती. मुंबई क्राईम ब्रँचने रेणू शर्मा हिला 21 एप्रिलला मुंबई न्यायालयासमोर हजर केले होते. मुंबई न्यायालयाने रेणू शर्माला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, आज रेणू शर्मास दोन दिवसांची मुदत संपल्याने पोलिसांनी न्यायालयासमोर पुन्हा हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडीत आणखी २ दिवसांची वाढ केली आहे.

रेणू शर्मा हिच्या वकिलांनी रेणू ही करुणा शर्मा यांची बहीण असून, करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी नाहीत तर केवळ त्यांचे लिव्ह - इन संबंध होते, असे आपल्या युक्तिवादात रेकॉर्डवर नमूद केले आहे.

रेणूविरोधात इतरही अनेकांच्या खंडणी मागीतल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे रेणू हिची व्यवस्थित चौकशी होणे, तिचे बँक खाते व अन्य मालमत्ता तपासणे गरजेचे असणे कोर्टाने नमूद केले.

Web Title: Court slaps Renu Sharma, blackmailing, ransom case: Police remand extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.