नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या कोर्ट सुनावणार निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:36 PM2022-02-28T19:36:08+5:302022-02-28T19:36:49+5:30
मुंबई - भाजपाचे नेते नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सत्र न्यायालय निर्णय घेणार आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट ...
मुंबई - भाजपाचे नेते नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सत्र न्यायालय निर्णय घेणार आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल आहे. न्या. दीपक भागवत यांच्यापुढे सोमवारी सुनावणी पार पडली.
"बाप बेटे जेल जाएंगे"असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनंतर नील सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. 'निकॉन इन्फ्रा'च्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत आरोप केला होता.
या पत्रकार परिषदेत त्यांनी किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांचे संबंध असल्याचा दावा करत आरोप केला होता. यानंतर संजय राऊत यांनी बाप बेटे दोनो जेल मे जाएंगे असं म्हटलं होतं. यानंतर नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावार सुनावणी पूर्ण झाली आहे. नील सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर होणार का याचा निर्णय उद्या जाहीर होणार आहे. या निर्णयाकडे किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि भाजपसह शिवसेनेचं लक्ष लागलं आहे.
नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या निर्णय, भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल pic.twitter.com/tE2hBX8ohA
— Lokmat (@lokmat) February 28, 2022