बॉयफ्रेंडची हत्या करून मॉडेलनं पोलिसांना कॉल केला; कोट्यवधी रुपये लपवले मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 03:51 PM2022-11-22T15:51:02+5:302022-11-22T15:51:42+5:30

१५ नोव्हेंबर रोजी कर्टनी क्लेनी कोर्टात हजर झाली. बॉयफ्रेंड क्रिस्टियन ओबुमेलीची कथित हत्या केल्यानंतर कर्टनीने पोलिसांनाही कॉल केला.

Courtney Clenney Case: Killed boyfriend in a fit of rage and called the police | बॉयफ्रेंडची हत्या करून मॉडेलनं पोलिसांना कॉल केला; कोट्यवधी रुपये लपवले मग...

बॉयफ्रेंडची हत्या करून मॉडेलनं पोलिसांना कॉल केला; कोट्यवधी रुपये लपवले मग...

Next

एका एडल्ट मॉडेलनं तिच्या बॉयफ्रेंडची हत्या केल्याचं प्रकरण अमेरिकेत उघड झालं आहे. या मॉडेलनं एका वेबसाईटवर एडल्ट कन्टेंट पब्लिश करून तब्बल २५ कोटी रुपये कमावले होते. गुन्हा केल्यानंतर तपासावेळी तिच्या संपत्तीचा खुलासा होऊ नये यासाठी मॉडेलने तिच्या बँकेतून बरीच रक्कम तिच्या वडिलांच्या खात्यात ट्रान्सफर केली होती असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. 

अमेरिकन मॉडेल कर्टनी क्लेनीला तिच्या प्रियकराच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला आहे. सोशल मीडियावर तिला कर्टनी टेलर या नावाने ओळखले जाते. तिला ३ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर सध्या मानसिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी कर्टनीला पाठवलं आहे. सरकारी वकिलांनी म्हटलं की, २६ वर्षीय कर्टनीने क्रिप्टोकरन्सी ट्रेडर बॉयफ्रेंड क्रिस्टियन ओबुमेलीची हत्या केल्यानंतर, स्वत:च्या वडिलांच्या खात्यात ९.६ कोटी रुपये पाठवले, हा व्यवहार तिने तिची संपत्ती लपवण्यासाठी केला होता.

आधी मारलं, मग पोलिसांना कॉल केला...
१५ नोव्हेंबर रोजी कर्टनी क्लेनी कोर्टात हजर झाली. बॉयफ्रेंड क्रिस्टियन ओबुमेलीची कथित हत्या केल्यानंतर कर्टनीने पोलिसांनाही कॉल केला. सुरुवातीच्या तपासात पोलिसांना वाटले की, कर्टनीने सेल्फ डिफेन्समध्ये प्रियकराची हत्या केली. मात्र समोर आलेल्या नव्या पुराव्यांमुळे या प्रकरणाची दिशाच बदलली आहे. कर्टनीवर आता खुनाचा आरोप आहे.

मुलीचे तिच्या रागावर नियंत्रण नव्हते
वकील खलील क्विनन यांनी सांगितले की, सापडलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये तिने करोडो रुपये कमावल्याचे स्पष्ट झाले आहे, ती पळून जाण्याचाही प्रयत्न करत होती. मेसेज आणि इतर गोष्टींच्या तपासणीनंतर हे देखील समोर आले आहे की कर्टनी नेहमीच तिच्या प्रियकराला त्रास देत असे आणि तिने रागावर नियंत्रण ठेवले नाही. मात्र कर्टनीने दावा केला की, तिने स्वसंरक्षणार्थ ओबुमेलीची हत्या केली. तपासादरम्यान, कर्टनीने ओबुमेलीला हिंसक आणि धमकी देणारा व्यक्ती म्हणून प्रतिमा बनवली. परंतु या संपूर्ण प्रकरणात पहिला हल्ला कर्टनीने केला होता. या जोडप्यामधील बिघडलेल्या नात्यासाठी ती देखील जबाबदार होती. तिने रागाच्या भरात ओबुमेलीची हत्या केली.

कर्टनीला अटक करून तिच्याविरुद्ध चौकशी सुरू झाली तेव्हा तिच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचेही समोर आले. 
मात्र बचावात कर्टनीचे वकील फ्रँक प्रीटो यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी असल्याचं सांगितलं. मंगळवारी त्यांनी दावा केला की, जेव्हा लास वेगासमध्ये या जोडप्यामध्ये भांडण झाले तेव्हा कर्टनीने सिक्युरिटीला बोलावले होते. पोलिसांच्या कागदपत्रांमध्ये हे नाही. तसेच सरकारी वकिलांनी नुकसानीचे रेकॉर्डिंग सादर केले आहे असं फ्रँक यांनी सांगितले. या खटल्यातील जामीनाबाबतची सुनावणी यापुढेही सुरू राहणार असून, वैद्यकीय परीक्षकांसमोर जबाब होणार आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Courtney Clenney Case: Killed boyfriend in a fit of rage and called the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.