चुलत भाऊच निघाला बहिणीचा मारेकरी, 'या' कारणाने बेदम मारहाण करत केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 04:39 PM2021-07-09T16:39:25+5:302021-07-09T16:52:25+5:30
महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांनी हत्येप्रकरणी तिचा चुलत भाऊ चंदन सिंह आणि त्याचा मित्र मनोजला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून एका चुलत भावाने बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमिया गावातील ही घटना असून मृत महिलेचं नाव ज्योति आहे. महिलेची ओळख पटल्यावर पोलिसांनी हत्येप्रकरणी तिचा चुलत भाऊ चंदन सिंह आणि त्याचा मित्र मनोजला अटक केली आहे. चौकशीत चंदनने सांगितलं की, परिवाराची बदनामी होत असल्याने रागावून त्याने बहिणीची हत्या केली.
आरोपीनुसार, पतीच्या मृत्यूनंतर डबली ऊर्फ ज्योति माहेरीच राहत होती. तिच्या घरी अनेक लोकांचं येणंजाणं होतं. २४ तासांच्या आत केस सॉल्व्ह करत पोलिसांनी आरोपीला मंगळवारी कोर्टात सादर करून तुरूंगात पाठवलं.
एसपी मनोज अवस्थी यांच्यानुसार, सोमवारी सकाळी अहमिया गावात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या तपासात समोर आलं की, महिला त्याच गावातील राहणारी ज्योति आहे. तिचं लग्न १५ वर्षापूर्वी राजेंद्र नगरमध्ये झालं होतं आठ महिन्यांपूर्वी ज्योतिच्या पतीने आत्महत्या केली. त्यानंतर ती माहेरी निघून आली. (हे पण वाचा : धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या मित्राचे धडावेगळे केले शीर)
दोघांची दोन मुले आजी-आजोबांकडे आहे. ज्योतिचा सांभाळ तिचा चुलत भाऊ चंदन सिंह करत होता. तीन जुलैला चंदन दारू प्यायला अड्ड्यावर गेला होता. तेव्हा कुणीतरी चंदनला टोमणा मारत ज्योतिबाबत अपशब्द काढला होता. यामुळे संतापलेल्या चंदनने तिच्या हत्येचा प्लॅन केला. त्याच रात्री जाऊन त्याने मित्रासोबत ज्योतिला बेदम मारहाण केली आणि तिचा जीव घेतला.
चंदनने तीन जुलैला हत्या केल्यावर मृतदेह घरातच लपून ठेवला होता. जेव्हा मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा मित्राच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यांनी मृतदेह नेऊन रस्त्याच्या किनारी फेकला. बहिणीच्या हत्येप्रकरणी अटक झालेला चंदन याआधीही तुरूंगात जाऊन आला.
ज्योतिच्या पतीने का केली आत्महत्या?
पोलिसांनी सांगितलं की, ज्योतिचा पती तिच्या वागण्यामुळे परेशान होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या केली. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा सांभाल पतीचे आई-वडील करतात. माहेरी परत आल्यावरही ज्योतिच्या वागण्यात काही बदल झाला नाही. त्यामुळे तिच्या वागण्याला कंटाळून तिच्या चुलत भावाने तिची हत्या केली.