अल्पवयीन पुतणीवर चुलत काकाने केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 10:55 AM2021-05-27T10:55:53+5:302021-05-27T10:57:14+5:30
Crime News : १६ वर्षीय मुलीवर चुलत काकाने घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना २६ मे रोजी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव राजा : ढोरपगाव येथील १६ वर्षीय मुलीवर चुलत काकाने घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना २६ मे रोजी उघडकीस आली. पीडित मुलगी व तिच्या आईवडीलांनी पोलीसात दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.
ढोरपगाव येथील ३२ वर्र्षीय नराधमाने १६ मे रोजी गावातीलच १६ वर्षीय पुतणीला घरी कोणी नसल्याचे पाहून बोलावले. बालिकेला चपात्या बनवण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर नराधमांने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने धमकी दिल्याने भयभीत झालेल्या पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती तिच्या आईवडिलांना आठवडा उलटल्यावर सांगितली. पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलिस ठाणे गाठून झालेल्या घटनेची तक्रार ठाणेदार सचिन चव्हाण यांच्याकडे दिली. ठाणेदार सचिन चव्हाण यांनी तापसचक्रे फिरवून आरोपीला त्याच्या राहत्या घरून अटक केली. आरोपविरुद्ध कलम ३७६, ५०६, भादंवी सहकलम ४ पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. २५ मे रोजी पोलिसांनी आरोपीला खामगाव येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरूवारी पुन्हा आरोपीला न्यायालयात हजर करणार आहेत.या घटनेचा अधिक तपास ठाणेदार सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोहर हिवाळे, मंगलसिंग चव्हाण, शीतल पहुरकर करीत आहेत.