कोविड काळातही अधिकाऱ्यांची वसुली जोमात; ६०० लाचखोरांना अटक, २०० दिवसांत कोट्यवधी उकळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:48 AM2021-07-28T07:48:31+5:302021-07-28T07:49:46+5:30
गतवर्षी याच कालावधीत ३३१ ट्रॅपमध्ये ४६२ आरोपी होते. यंदा त्यात १०४ वाढीव ट्रॅपची भर पडली. म्हणजेच कोरोनाकाळातही लाचखोर सुसाट सुटल्याचे संतापजनक चित्र आहे.
प्रदीप भाकरे
अमरावती : यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच उकळली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कालावधीत ४३५ ट्रॅप यशस्वी केले. गतवर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅपपध्ये तब्बल ३१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
गतवर्षी याच कालावधीत ३३१ ट्रॅपमध्ये ४६२ आरोपी होते. यंदा त्यात १०४ वाढीव ट्रॅपची भर पडली. म्हणजेच कोरोनाकाळातही लाचखोर सुसाट सुटल्याचे संतापजनक चित्र आहे. यंदाच्या पहिल्या २०० दिवसांत एसीबीने जे ४३५ ट्रॅप यशस्वी केले, त्यात ६०० लाचखोरांना अटक करण्यात आली. सर्वाधिक लाचखोर क्लास थ्री कर्मचारी आहेत.
२०० दिवसांच्या कालावधीत तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच उकळली.
लाचखोर | ‘क्लास’ | लाचेची रक्कम |
40 | क्लास वन | २८ लाख ४९ हजार रुपये |
56 | क्लास टू | १५ लाख ८५ हजार २०० रुपये |
344 | क्लास थ्री | ५३ लाख ९१ हजार ७५० रुपये |
29 | क्लास फोर | ४ लाख ४ हजार ४ लाख ४ हजार |
68 | खासगी व्यक्ती | ४ लाख १२ हजार ८०० रुपये |
63 | अन्य लोकसेवक | ३ लाख २६ हजार ९०० रुपये |
600 | एकूण | १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपये |