घोड्याच्या बेटिंगनंतर क्रिकेट बेटिंगचा पदार्फाश; पैशांवरुन खंडणी मागणाऱ्या लाईन बॉयसह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:57 PM2021-02-11T14:57:14+5:302021-02-11T14:58:04+5:30

Cricket Betting : याप्रकरणी उमेश अशोक मुलचंदानी (वय २३, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Cricket betting after horse betting; Two arrested along with line boy demanding ransom from money | घोड्याच्या बेटिंगनंतर क्रिकेट बेटिंगचा पदार्फाश; पैशांवरुन खंडणी मागणाऱ्या लाईन बॉयसह दोघांना अटक

घोड्याच्या बेटिंगनंतर क्रिकेट बेटिंगचा पदार्फाश; पैशांवरुन खंडणी मागणाऱ्या लाईन बॉयसह दोघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे अजय शिंदे (रा. खडक पोलीस वसाहत, कल्याणीनगर) आणि गौरव आहुला (वय २०, रा. टिळक रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे : ऑनलाईन क्रिकेट बेटिंगमध्ये पैसे हरल्यानंतर पळून गेलेल्या मित्राचे पैसे एका हॉटेल व्यावसायिकाला मागणार्या लाईन बॉयसह दोघांना
गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे.

अजय शिंदे (रा. खडक पोलीस वसाहत, कल्याणीनगर) आणि गौरव आहुला (वय २०, रा. टिळक रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सचिन पोटे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अजय शिंदे याचे वडिल पोलीस कर्मचारी होते. अजय शिंदे याच्यावर यापूर्वी मारामारीचे गुन्हे असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला घरातून हकलून दिले होते. सचिन पोटे हाही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

याप्रकरणी उमेश अशोक मुलचंदानी (वय २३, रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश मुलचंदानी याच्या दुकान आहे. गौरव आहुजा याच्या वडिलांचे विमाननगर येथे हॉटेल आहे. पण त्याला वडिलांच्या हॉटेलमध्ये बसायचे नव्हते. त्यासाठी त्याने ऑनलाईन बेटिंगचा व्यवसाय सुरु केला. गौरव व उमेश हे ओळखीचे आहेत. गौरवने मी बेटिंगचा व्यवसाय सुरु केला असून कोणाला खेळायचे असेल तर सांग असे म्हणाला होता. उमेश याच्या ओळखीचा रजत ग्रोवर याने बेटिंगविषयी विचारल्यावर त्याने गौरवकडे त्याला पाठविले होते. गौरवकडे ऑनलाईन बेटिंग खेळात गौरवर हा अडीच लाख रुपये हरला. तो गौरव याला पैसे न देताच गावी पळून गेला. त्यामुळे तु त्याला पाठविले होते, त्याने पैसे दिले नाहीत, आता ते पैसे तु दे, अशी मागणी गौरव हा उमेशकडे करु लागला. जर मी खेळलो नाही तर तुला कशाचे पैसे देणार असे उमेश म्हणाला. त्यानंतर अजय शिंदे याचा उमेश याला फोन आला. त्याने तु मला ओळखत नाही का मी अयजय शिंदे खडक पोलीस लाईन. बाहेर कोणालाही विचार अजय शिंदे कोण आहे. आणि त्यानंतर बोल माझ्याशी. तुला मी सांगतो तेवढे ऐक मॅचचे पैस आहेत, तुला मी परत
सांगतो. तुझ्याकडे मी येणे इतका तू मोठा नाहीस, येडे चाळे करु नकोस. मी कल्याणीनगर येथे थांबलो आहे. तू येथे ये अशी धमकी अजय शिंदे याने देऊन अडीच लाखांची खंडणी मागितली. याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने तातडीने हालचाल करुन गौरव आहुला आणि अजय शिंदे याला अटक केली.

याबाबत पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांनी सांगितले की, या ऑनलाईन बेटिंगमध्ये अनेक बड्यांनी आर्थिक गुंतवणुक केली आहे. आहुजा हा एक
त्यातील लिंक आहे. गौरव आहुजा आणि फिर्यादी यांच्या संभाषणात अजय शिंदे हाही या बेटिंगमध्ये आहुजाचा पार्टनर असल्याचा उल्लेख आहे. त्यादृष्टीने आम्ही तपास करीत आहोत.

Web Title: Cricket betting after horse betting; Two arrested along with line boy demanding ransom from money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.