उल्हासनगरात आमदार आयलानीच्या कार्यालय समोरील इमारतीत क्रिकेट सट्टा, एकावर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Published: August 30, 2022 09:40 PM2022-08-30T21:40:41+5:302022-08-30T21:41:53+5:30
उल्हासनगर गोल मैदान परिसरातील मधूबन इमारतीच्या प्लॉट नं-५०१ मध्ये भारत व पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टा चालल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली.
उल्हासनगर : कॅम्प नं-२ मधूबन चौकातील मुकुंद अपार्टमेंट इमारतीच्या ५ व्या मजल्यावर भारत व पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या एकाला पोलिसांनी रविवारी रात्री ९ वाजता धाड टाकून अटक केली. त्याच्याकडून ६ मोबाईलसह इतर साहित्य जप्त केले असून क्रिकेट सट्टा ज्या इमारतीमध्ये चालतो, ती इमारत आमदार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर आहे.
उल्हासनगर गोल मैदान परिसरातील मधूबन इमारतीच्या प्लॉट नं-५०१ मध्ये भारत व पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टा चालल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. रविवारी रात्री ९ वाजता पोलिसांनी इमारतीच्या प्लॉट नं-५०१ मध्ये धाड टाकली. यावेळी संजय मंगुमल हरदासानी हा आशिया चषक मधील भारत व पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टा खेळत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. विविध मोबाईल वरून क्रिकेट सट्टा लावत असल्याचे यावेळी उघड झाले असून त्याच्याकडून ६ मोबाईलसह इतर ३३ हजाराचे साहित्य जप्त केले आहे.
उल्हासनगर पोलिसांनी क्रिकेट सट्टा प्रकरणी संजय हरदासानी यांच्यावर गुन्हा दाखल केला. संजय हरदासानी याच्या व्यतिरिक्त यासट्टा मध्ये सहभागी असलेल्यांची चौकशी पोलीस करीत असून शहरात क्रिकेट सट्टा खेळणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. क्रिकेट सट्टा ज्या इमारती मध्ये सुरू होता. ती इमारत आमदार कुमार आयलानी यांच्या संपर्क कार्यालयासमोर आहे. तसेच कार्यालयात दिवसभर नेहमी वर्दळ असून आयलानी यांच्या संरक्षणासाठी पोलीस तैनात असतात. क्रिकेट सट्टा प्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहे.