Crime : विमानतळावरुन 6 किलो सोन्याची बिस्कीटे जप्त, कस्टमची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 03:25 PM2021-04-17T15:25:56+5:302021-04-17T15:26:19+5:30
Crime : तामिळनाडूतील चेन्नई विमानतळावरुन तब्बल 6 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. पांढऱ्या चिकट टेपच्या सहाय्याने ही सोन्याची बिस्कीटे गुंडाळण्यात आली होती.
चेन्नई - देशात सध्या कोरोनाचा जोर वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे आदेश प्रशासनाकडू देण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरळीत असतानाही नियमांचे पालन बंधनकारक आहे. मात्र, या कडक निर्बंधातही चेन्नई विमानतळावरुन सोन्याची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे.
तामिळनाडूतील चेन्नई विमानतळावरुन तब्बल 6 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. पांढऱ्या चिकट टेपच्या सहाय्याने ही सोन्याची बिस्कीटे गुंडाळण्यात आली होती. दुबई ते चेन्नई या प्रवासादरम्यान ही सोन्याची तस्करी करण्यात येत होती. विमानातील सीटच्या कुशनखाली सोन्याची बिस्कीटे लपविण्यात आली होती. येथील कस्टम विभागाला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रवाशावर वॉच ठेऊन ही कारवाई केली.
Tamil Nadu: 6 kg of gold, worth Rs 2.90 crores, seized by Chennai Air Customs. The gold bars were wrapped with white adhesive tapes and found concealed under one of the seat cushions of the aircraft, coming from Dubai. pic.twitter.com/VVVjPkRtKM
— ANI (@ANI) April 17, 2021
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोन्याची 6 बिस्कीटे जप्त केली असून प्रत्येक बिस्कीटाचे वजन 1 किलो आहे. एकूण 6 किलो वजनाचे ही सोन्याची बिस्कीटे असून त्यांचे बाजारमुल्य 2.90 करोड रुपये आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हे सोने जप्त केले असून आरोपीस ताब्यात घेतले आहे.