लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या पोलिसासह ४ जणांविरोधात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 10:03 PM2020-10-27T22:03:13+5:302020-10-27T22:03:52+5:30

Sexual harrasment : याप्रकरणी वडील वसंत भाटेवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर तीन जण फरार आहेत.

Crime against 4 persons including police for torturing by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या पोलिसासह ४ जणांविरोधात गुन्हा 

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या पोलिसासह ४ जणांविरोधात गुन्हा 

googlenewsNext
ठळक मुद्दे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मेहुणबारे येथील २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव जि. जळगाव :  लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार आणि नंतर तरुणीची फसवणूक करणाऱ्या नेवासा येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक समाधान वसंत भाटेवाल व  त्यांचा भाऊ  अरुण भाटेवाल, वडील वसंत भाटेवाल व पप्पू कुमावत यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वडील वसंत भाटेवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर तीन जण फरार आहेत.


चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला मेहुणबारे येथील २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत त्या तरुणीने म्हटले आहे की,फौजदार  समाधान भाटेवाल यांच्या वाढदिवसाच्या दिवशी  २९ जुलै २०१८  रोजी  त्यांनी आपणास  चाळीसगाव येथे बोलावून घेतले.  जहागीरदारवाडी परिसरात मित्राच्या खोलीवर नेत लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर चाळीसगाव येथे वेळोवेळी लॉजमध्ये  तसेच उपनिरीक्षक पदाची ट्रेनिंग घेत असताना आपणास नाशिक येथे बोलावून तेथे भाड्याने खोली घेवून वेळोवेळी  माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले .नंतर मात्र लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्यामुळे त्या तरुणीने शहर पोलीसात पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह इतर तिघांसह फिर्याद दिली आहे. त्यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे करीत आहेत.

Web Title: Crime against 4 persons including police for torturing by showing the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.