बाप की पिशाच्च! पोटच्या मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या पित्यावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:15 PM2020-07-18T22:15:39+5:302020-07-18T22:20:09+5:30
याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बापावर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.
पिंपरी : पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री साडेआठच्या सुमारास दिघी येथे घडली. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बापावर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती- पत्नी आहेत. त्यांना अकरा वर्षाची मुलगी आहे. दरम्यान, आरोपी पित्याने गुरुवारी रात्री मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने याबाबत आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम तपास करीत आहेत. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार
...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'
मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला