पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणा-या पतीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 07:09 PM2020-08-23T19:09:10+5:302020-08-23T19:10:53+5:30

सासरच्या मंडळींनी विवाहितेचा किरकोळ कारणांवरून मानसिक व शारीरिक छळ केला. वारंवार वाद होत असल्याने विवाहितेने पतीला नांदेड सिटी येथे राहण्यास जाण्याची विनंती केली.

Crime against a husband who refuses to have sexual relations with his wife | पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणा-या पतीवर गुन्हा

पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणा-या पतीवर गुन्हा

Next

पिंपरी - किरकोळ कारणांवरून त्रास देऊन विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच पतीने तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. या प्रकरणी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. रहाटणी येथे ३ मार्च २०१८ पासून २२ आॅगस्ट २०२० या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी ३४ वर्षीय विवाहित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती शेखर जगदीश पाटील, सासरे जगदीश पाटील, सासू रेखा जगदीश पाटील, भावजय सेजल पाटील (सर्व रा. रहाटणी), यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी विवाहितेचा किरकोळ कारणांवरून मानसिक व शारीरिक छळ केला. वारंवार वाद होत असल्याने विवाहितेने पतीला नांदेड सिटी येथे राहण्यास जाण्याची विनंती केली. त्यावरून पतीने विवाहितेला शिवीगाळ करून अपमान केला. तसेच पतीने दोन वर्षांपासून फिर्यादी विवाहितेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार देऊन त्यांचा मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Crime against a husband who refuses to have sexual relations with his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.