साडेचार हजाराची लाच मागणाऱ्या अभियंत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 08:05 PM2019-02-22T20:05:31+5:302019-02-22T20:06:11+5:30
लाच मागणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता आणि शिपाई अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव - काँक्रीटीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ४५०० रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता आणि शिपाई अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी जिल्हा परिषदेतच ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता पी.डी.पवार (४५, रा. जळगाव) आणि ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचारी मंगेश गंभीर बेडीस्कर (३५, रा. जळगाव) यांचा समावेश आहे.