महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 06:58 PM2020-09-03T18:58:08+5:302020-09-03T18:58:48+5:30
बिच्छुटेकडी येथील घटना
अमरावती : घराजवळच राहणाऱ्या दोन युवकांनी शरीरसुखाची मागणी केली. ही घटना बिच्छुटेकडी परिसरातील राहुलनगर येथे बुधवारी घडली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
नमोद किसनराव सोनटक्के व सिद्धार्थ घाटोळ (रा. राहुलनगर) असे आरोपीचे नाव आहे. यातील आरोपी नमोद हा सदर महिलेला हातवारे करू इशारा करतो. एका रात्रीसाठी माझ्या जवळ ये, असे म्हणून शरीरसुखाची मागणी करून त्याने विनयभंग केला. माझा भाऊ पोलीसमध्ये आहे. तुला तो खोट्या प्रकरणात फसवेल, अशी धमकीही सदर युवकाने महिलेला दिली. याप्रकरणी दोघांविरुद्ध कलम ३५४, ३५४ (अ), २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा
सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर
ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त