घरात अतिरिक्त दरवाजा व खिडकी बनवली म्हणून महिलेवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 11:36 PM2021-12-26T23:36:57+5:302021-12-26T23:37:31+5:30
Crime News : सदर सदनिकेत त्यांनी महापालिकेची परवानगी न घेता अतिरिक्त दरवाजा आणि अतिरिक्त खिडकी काढली होती . सप्टेंबर महिन्यात गायत्री यांना पालिकेने नोटीस बजावून सदर अतिरिक्त दरवाजा व खिडकी काढून घेण्यास सांगितले होते .
मीरारोड - मीरारोडमधील एका इमारतीती राहणाऱ्या महिलेने तिच्या राहत्या सदनिकेत एक अतिरिक्त दरवाजा आणि खिडकी काढली म्हणून मीरा भाईंदर महापालिकेने ते बांधकाम बेकायदा ठरवून त्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
महापालिकेच्या प्रभाग समिती ४ च्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिलेल्या फिर्यादी नुसार जय सुरभी इमारतीतील सदनिका धारक गायत्री बादुलकर यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शिवार उद्यान जवळील देव पॅरेडाइज संकुला लगत असलेल्या जय सुरभी इमारतीत गायत्री बादुलकर यांची सदनिका आहे . सदर सदनिकेत त्यांनी महापालिकेची परवानगी न घेता अतिरिक्त दरवाजा आणि अतिरिक्त खिडकी काढली होती. सप्टेंबर महिन्यात गायत्री यांना पालिकेने नोटीस बजावून सदर अतिरिक्त दरवाजा व खिडकी काढून घेण्यास सांगितले होते . परंतु ते काढून न घेतल्याने अनधिकृत बांधकाम केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .