सार्वजनिक रोडवर विनापरवाना स्टेज उभारल्याने तरुणाविरुद्ध गुन्हा, सोलापुरातील घटना

By विलास जळकोटकर | Published: October 25, 2023 05:44 PM2023-10-25T17:44:25+5:302023-10-25T17:45:17+5:30

मंगळवारी रात्री १०.३०च्या सुमारास प्रकार आला उघडकीस

Crime against youth for erecting stage on public road without permission, incident in Solapur | सार्वजनिक रोडवर विनापरवाना स्टेज उभारल्याने तरुणाविरुद्ध गुन्हा, सोलापुरातील घटना

सार्वजनिक रोडवर विनापरवाना स्टेज उभारल्याने तरुणाविरुद्ध गुन्हा, सोलापुरातील घटना

विलास जळकोटकर, सोलापूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं विनापरवाना अनधिकृतपणे स्टेज उभारल्यावरुन एका तरुणाविरुद्ध सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी रात्री १०:३० च्या सुमारास मसिहा चौक ते केंद्रीय विद्यालय मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला.

राजू भीमराव गायकवाड (वय- २५, रा. जगजीवनराम झोपडपट्टी, मोदीखाना, सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सूर्यकांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मसिहा चौक ते केंद्रीय विद्यालयाच्या रोडवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने राजू गायकवाड यांनी भर रस्त्यावर परवानगीविना अनधिकृत २५ बाय २५ चे स्टेज उभारुन वाहतुकीला अडथळा निर्माण केला. लोकांची गैरसोय केल्याचे म्हटे आहे. अधिक तपास पोलीस नाईक माडे करीत आहेत.

Web Title: Crime against youth for erecting stage on public road without permission, incident in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.