रिक्षाचालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याने गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 11:15 PM2020-10-31T23:15:28+5:302020-10-31T23:15:53+5:30

Crime News : घणसोली सेक्टर १६ येथे राहणाऱ्या संजय सिंग (२५) या रिक्षाचालकाच्या घरावर शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. सिंग हा घरात एकटाच असताना, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याला दरवाजा वाजल्याचा आवाज आला. 

Crime of armed robbery on autorickshaw driver's house | रिक्षाचालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याने गुन्हा

रिक्षाचालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याने गुन्हा

Next

नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून पिस्तुलीच्या धाकावर दरोडा टाकल्याची घटना घणसोलीत घडली आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दरोडा टाकणाऱ्यांपैकी एक जण तक्रारदाराच्या ओळखीचा असून, यापूर्वी त्याला उसने पैसेही दिले होते.
घणसोली सेक्टर १६ येथे राहणाऱ्या संजय सिंग (२५) या रिक्षाचालकाच्या घरावर शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. सिंग हा घरात एकटाच असताना, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याला दरवाजा वाजल्याचा आवाज आला. 
यामुळे त्याने दरवाजा उघडला असता, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने पिस्तुलीचा धाक दाखवत घरात प्रवेश मिळवला. यावेळी सिंग याच्या जुन्या ओळखीतला सागर ढोणे हाही सोबत होता. दोघांनी घरात प्रवेश करून पिस्तुलीचा धाक दाखवत, कपाटातील २० हजार रुपयांची रोकड, मोबाइल, तसेच संगणक चोरून नेला, तसेच घडलेल्या घटनेची पोलिसांकडे तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. दरम्यान, दोघे जण घरात घुसले असता, त्यांचा तिसरा साथीदार टेरेसवरून पाळत ठेवत होता. या जबरी लुटीनंतर त्यांनी सिंग याला घरात कोंडून बाहेरून कडी लावून पळ काढला. सिंग याने 
सागर ढोणे याला दोन वर्षांपूर्वी १५ हजार रुपये उसने दिले होते. 
मात्र, ही रक्कम परत मागितली असता, तो धमकावत होता. याच रागातून त्याने दोन साथीदारांसह 
घरी दरोडा टाकला असल्याची शक्यता सिंग याने वर्तविली 
आहे. त्यानुसार, रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: Crime of armed robbery on autorickshaw driver's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.