बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्याला गुन्हे शाखेच्या युनिट एक ने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 03:07 PM2018-07-10T15:07:29+5:302018-07-10T15:09:55+5:30
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पुणे पाेलीसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने एकाला अटक केली अाहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात अाले अाहे.
पुणे : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पुणे पाेलीसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने एकाला अटक केली अाहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात अाले अाहे.
याप्रकरणी अनिल अरुण कांबळे (वय 21, रा. गणपती मंदीराजवळ, वाघाेली) याला पाेलीसांनी अटक केली अाहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट 1 चे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक नितीन भाेसले पाटील यांच्यासह या शाखेचे अधिकारी व कर्मचारी वाहन चाेरीच्या तसेच घरफाेडीच्या गुन्ह्यातील अाराेपींचा शाेध घेत हाेते. यावेळी पाेलीस नाईक सचिन जाधव यांना एक व्यक्ती काेरेगाव पाेलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा शस्त्र बाळगून साऊथ मेन राेड, काेरगाव पार्क येथे उभा अाहे, अशी माहिती खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार युनिट 1 च्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन अाराेपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल तसेच 1 जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाला.
ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पाेलीस अायुक्त प्रदीप देशपांडे, पाेलीस उप अायुक्त पंकज डहाणे , सहायक पाेलीस अायुक्त समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक नितिन भाेसले-पाटील, पाेलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, पाेलीस नाईक सचिन जाधव, इम्रान शेख अादींनी केली.