दीड वर्षाआधी केला होता छेडछाडीचा विरोध, चुलत सासऱ्याने गोळी झाडून घेतला सूनेचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 02:08 PM2021-10-01T14:08:45+5:302021-10-01T14:09:06+5:30

आश्चर्याची बाब म्हणजे यानंतर आरोपी स्वत:ला पिस्तुल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. 

UP Crime : Cousin father in law shot dead woman after protesting molestation in Amroha | दीड वर्षाआधी केला होता छेडछाडीचा विरोध, चुलत सासऱ्याने गोळी झाडून घेतला सूनेचा जीव

दीड वर्षाआधी केला होता छेडछाडीचा विरोध, चुलत सासऱ्याने गोळी झाडून घेतला सूनेचा जीव

Next

उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये चुलत सासऱ्यांनी आपल्या सूनेची गोळी झाडून हत्या केली. सूनेचा गुन्हा इतकाच होता की, तिने तिच्यासोबत होत असलेल्या छेडछाडीचा विरोध केला होता. यामुळे चुलत सासऱ्याला इतकं वाईट वाटलं की, त्याने सूनेवर गोळी झाडून तिची हत्या केली. आश्चर्याची बाब म्हणजे यानंतर आरोपी स्वत:ला पिस्तुल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. 

ही घटना  दीपपूर गावातील आहे. जिथे ३५ वर्षीय सीमा बुधवारी आपल्या घराच्या व्हरांड्यात झोपली होती. बाजूलाच लहान मुलगा झोपला होता. सासू आणि मोठा मुलगा वरच्या रूममध्ये झोपले होते. तेव्हाच रात्री २ वाजता शेजारीच राहत असलेला चुलत सासरा राजपाल छतावरून घरात शिरला आणि सीमाच्या डोक्यावर पिस्तुल लावून गोळी झाडली. यामुळे सीमाचा जागी मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी पाच वाजता आरोपी राजपाल पिस्तुल घेऊन स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्यानेच पोलिसांना गोळी झाडल्याची सूचना दिली.  

सीमाचे पती कुंवरपाल चौहानचा तीन वर्षापूर्वी एका अपघातात मृत्यू झाला होतात. यानंतर पासून ती दीराकडे राहत होता. दीर अरविंद बरेलीच्या एका फॅक्टरीमध्ये नोकरी करत होता.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी राजपाल सीमाचा चुलत सासरा आहे आणि पतीच्या मृत्यूपासून तो सीमावर वाईट नजर ठेवून होता. पोलिसांनुसार, साधारण दीड वर्षाआधी त्याने सीमासोबतच छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाच सीमाने त्याला छतावर धक्का दिला होता. याचा सूड उगवण्यासाठी राजपालने सीमाची हत्या केली. 

हसनपूरच्या डेप्टी एसपी श्रेष्ठा ठाकुर यांनी सांगितलं की, आरोपी राजपालने आपल्या भावाच्या मुलाच्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली. त्याने स्वत: येऊन याची माहिती दिली. आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 

अमरोहाचे एसपी सीपी शुक्ला यांनी सांगितलं की, आरोपीने चौकशीत सांगितलं की, त्याच्या सूनेचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध होते. त्यामुळे तो नाराज होता. आरोपीने सांगितलं की, दोघांमध्ये यावरूनच वादही झाला होता. त्यामुळेच त्याने हे कृत्य केलं.
 

Web Title: UP Crime : Cousin father in law shot dead woman after protesting molestation in Amroha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.