दोन पाळीव कुत्र्यांना ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 11:27 PM2019-05-11T23:27:46+5:302019-05-11T23:28:16+5:30

याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी प्राण्यांची क्रूरतेने वागवल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे.

The crime file has been filed for killing two pet dogs | दोन पाळीव कुत्र्यांना ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दोन पाळीव कुत्र्यांना ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next

नालासोपारा - नालासोपारा पश्चिमेकडील मद्रेस गावातील बंगल्यात पाळलेल्या दोन कुत्र्यांना कोणी तरी ठार मारून फेकल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी प्राण्यांची क्रूरतेने वागवल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. 

नालासोपारा पश्चिमेकडील मद्रेस गावात जागृती प्रशांत वझे (33) यांचा सुखकर्ता बंगला आहे. त्यांनी आपल्या बंगल्यात टायगर आणि ब्लॅकी नावाचे दोन कुत्रे पाळले होते. कोणीतरी या दोन्ही कुत्र्यांना गुरुवारी रात्री ठार मारून समोरील बंगल्याच्या मागील तळ्याच्या कडेला आणि पडक्या विहिरीच्या कोपऱ्याला फेकून दिले आहे.

 

Web Title: The crime file has been filed for killing two pet dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.