नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 11:54 AM2020-06-18T11:54:51+5:302020-06-18T14:38:34+5:30

उत्पन्नापेक्षा २ कोटी ७५ लाख रुपयांची बेकायदा मालमत्ता

Crime filed against Director General of Town Planning Hanumant Nazirkar by Anti Corruption bureau Department | नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देउत्पन्नापेक्षा २ कोटी ८५ लाख रुपयांची बेकायदा मालमत्ता, पत्नी, दोन मुलांवरही गुन्हेगेल्या ६ ते ७ महिन्यांपासून त्यांची बेहिशोबी मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरु

पुणे : राज्याच्या नगर रचना विभागातील नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय५३), पत्नी संगिता हनुमंत नाझीरकर (वय ४५), गीतांजली हनुमंत नाझीरकर (वय२३), भास्कर हनुमंत नाझीरकर (वय २३, सर्व रा. स्वप्नशील्प सोसायटी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

नाझीरकर हे सध्या अमरावती येथे नियुक्तीला आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर यांच्या पुण्यातील कोथरुडमधील स्वप्नशील सोसायटीतील घरी तसेच अन्यत्र असलेल्या मालमत्तेवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी छापे घातले असून तेथे तपासणी सुरु आहे. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून त्यांची बेहिशोबी मालमत्तेबाबत उघड चौकशी सुरु होती. त्यांच्याविरुद्ध २३ जानेवारी १९८६ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यानच्या कालावधीतील उत्पन्नाचे परिक्षण करण्यात आले आहे. त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी त्यांच्याकडे २ कोटी ८५ लाख ३४ हजार २२३ रुपये इतकी बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. त्यात २००२ -२००३ मध्ये १ लाख ४४ हजार ७३७ रुपये, २०१५-१६ मध्ये २ कोटी ४७ लाख २५ हजार ३४५ रुपये, २०१६ -१७ मध्ये ३५ लाख ५२ हजार ६३८ रुपये आणि २०१७ - १८ मध्ये १ लाख ११ हजार ५०३ रुपयांचा समावेश आहे. या बेहिशेबी संपत्तीचे स्पष्टीकरण देण्याची संधी देऊनही ते देऊ शकले नाही. शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात ही मालमत्ता त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन भ्रष्टाचारातून कमाविली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुरुवारी सकाळी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सीमा मेंहदळे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 
नाझीरकर हे पूर्वी पुण्यातील नगर रचना कार्यालयात सहसंचालक म्हणून काम पहात होते. त्यावेळीही त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर त्यांची अमरावती येथे बदली झाली आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Crime filed against Director General of Town Planning Hanumant Nazirkar by Anti Corruption bureau Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.