पोलीस नियंत्रण कक्षातील महिलांशी अश्लिल बोलणाऱ्या चौघांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:53 PM2018-10-03T16:53:45+5:302018-10-03T16:55:07+5:30

पोलीस नियंत्रक कक्षातील १०० क्रमांक मोफत आहे़. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन त्यावर अनेकदा त्रास देण्याच्या हेतूने लोक फोन करीत होते़. 

Crime on four person for bad coversation with women in police control room | पोलीस नियंत्रण कक्षातील महिलांशी अश्लिल बोलणाऱ्या चौघांवर गुन्हे

पोलीस नियंत्रण कक्षातील महिलांशी अश्लिल बोलणाऱ्या चौघांवर गुन्हे

Next
ठळक मुद्देजयहिंद ही टेप सुरु केल्यानंतर असे त्रास देण्याच्या हेतूने केल्या जाणाऱ्या फोनमध्ये मोठी घट

पुणे : पोलीस नियंत्रण कक्षात फोन करुन तेथील महिला पोलिसांशी अश्लिल बोलून त्यांचा विनयभंग करणाऱ्या चौघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़ .
या घटना २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी आणि दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी तसेच २आॅक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजून १२ मिनिटांनी  हे फोन आले होते़. 
पोलीस नियंत्रक कक्षातील १०० क्रमांक मोफत आहे़. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन त्यावर अनेकदा त्रास देण्याच्या हेतूने लोक फोन करीत होते़.  पोलीस नियंत्रण कक्षात कॉल आल्यावर तो कोणत्या फोनवरुन आला. त्याचा क्रमांक तेथे दिसतो़. त्याची नोंदही होत असते़ हे चारही फोन मोबाईलवरुन केले होते़.  
पोलीस नियंत्रण कक्षात दिवसभरात असे काही हजार कॉल येत होते़.  पोलिसांनी १०० क्रमांकावर जयहिंद ही टेप सुरु केल्यानंतर असे त्रास देण्याच्या हेतूने केल्या जाणाऱ्या फोनमध्ये मोठी घट झाली़. लोकांना तातडीची मदत पोहचविण्यासाठी १०० क्रमांक गरजेच्या लोकांना पटकन लागू लागला आहे़.  त्याबद्दल लोकांनी पोलिसांचे अभिनंदनही केले होते़. असे असताना काही जण जाणीवपूर्वक १०० क्रमांकावर फोन देऊन तेथील महिला पोलिसांना त्रास देत असल्याचे आढळून आले़.  त्यामुळे अशांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे़. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात चौघांवर विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. 

Web Title: Crime on four person for bad coversation with women in police control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.