इन्स्टाग्रामवर ओळख मग मैत्री आणि नंतर अपहरण; पोलिसांनी अशी केली 13 वर्षीय मुलीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 05:11 PM2021-09-27T17:11:25+5:302021-09-27T17:22:46+5:30

Crime News : अल्पवयीन मुलगी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. त्यामुळे आता सोशल मीडियाचा होणारा वापर हा आजच्या घडीला घातक ठरत असल्याचचं वारंवार समोर आलं आहे. 

Crime News 13 year old kidnapped girl found in dombivli one arrested | इन्स्टाग्रामवर ओळख मग मैत्री आणि नंतर अपहरण; पोलिसांनी अशी केली 13 वर्षीय मुलीची सुटका

इन्स्टाग्रामवर ओळख मग मैत्री आणि नंतर अपहरण; पोलिसांनी अशी केली 13 वर्षीय मुलीची सुटका

Next

मयुरी चव्हाण 
 
डोंबिवली - डोंबिवलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना गुरुवारी समोर आली असताना सोमवारी पुन्हा डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आधी 13 वर्षीय मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख केली. त्यानंतर हळूहळू तिच्याशी मैत्री केली. तिला विश्वासात घेत फूस लावून तिचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली असून आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही अल्पवयीन मुलगी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. त्यामुळे आता सोशल मीडियाचा होणारा वापर हा आजच्या घडीला घातक ठरत असल्याचचं वारंवार समोर आलं आहे. 

अक्षय महाडिक असं या आरोपीच नाव असून खाजगी गुप्तहेराच्या मदतीने त्याला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. 20 सप्टेंबर रोजी, ही मुलगी क्लासला जाते अस सांगून घराबाहेर पडली ती पुन्हा आलीच नाही. शोधाशोध करूनही मुलीचा काहीच पत्ता लागत नसल्याने मुलीच्या पालकांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता अक्षय महाडिक या तरुणानेच मुलीचं अपहरण केलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अक्षयने तिला काल्हेर येथे एका फ्लॅट मध्ये कोंडून ठेवलं होतं. पोलिसांनी मुलीची सुटका करत सुखरूपपणे तिला आपल्या पालकांच्या स्वाधीन केलं आहे. 

अक्षयने आपला गुन्हा कबुल केला असून त्याच्यावर अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी ही आपल्या आईच्या मोबाईलवरून इंस्टाग्राम या सोशल साईटवर एक्टिव्ह होती. या माध्यमातूनच तिची अक्षयसोबत ओळख झाली आणि त्यानंतर फूस लावून अक्षयने तिचं अपहरण केलं. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस  ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी महत्वाची भूमिका बजावत 3 दिवसांत अटक केली आहे. सामूहिक बलात्काराची  घटना असो किंवा विनयभंगाची घटना यामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर हा समोर आला आहे. ऑनलाईन शिक्षण घेत असताना आता  मुलांच्या बाजूला बसून त्यांच्यावर लक्ष  ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.


 

Web Title: Crime News 13 year old kidnapped girl found in dombivli one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.