संतापजनक! 13 वर्षीय मुलीवर 16 जणांकडून बलात्कार; पित्याने सांगितली अंगावर काटा आणणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 06:10 PM2022-02-15T18:10:08+5:302022-02-15T18:16:02+5:30
Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी घटना घ़डली आहे. एका 13 वर्षीय मुलीवर झालेल्या 16 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घ़डली आहे. राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर 16 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अल्पवयीन मुलगी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली असता हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. मुलीच्या वडिलांनी अंगावर काटा आणणारी ही घटना सांगितली आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारी रोजी मुलगी जंगलामध्ये बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हा चार पाच जणांनी तिला गाठलं. एकानं तिचा चेहरा दाबला आणि दुसऱ्यानं तिला चाकूचा धाक दाखवून तिचं अपहरण केलं. यानंतर आणखी काही लोकही आले आणि त्यांनी मुलीवर बलात्कार केला. मुलीने त्यांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि ती घरी आली. घरी आल्यावर तिने वडिलांनी तिच्यासोबत घडलेला भयंकर प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली आहे.
मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही घटना भरतपूरच्या खोह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी 11 फेब्रुवारी रोजी जंगलात बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेली होती. मुलगी घरी न परतल्याने वडिलांनी आजूबाजूला शोधाशोध सुरू केली. 12 फेब्रुवारी रोजी वडिलांनी बेपत्ता मुलीची नोंद करण्यासाठी त्यांनी खोह पोलीस स्टेशन गाठलं. या वेळी मुलगी घरी परतल्याचं आढळून आलं. मुलीने घरी परत आल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना घडलेली सर्व घटना सांगितली. वडिलांनी 13 फेब्रुवारीला गँगरेपची तक्रार दाखल केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.