Crime News :बापरे...वर्ध्यात २६ लाखाच्या विदेशी दारूची अफरातफर; घटनास्थळावरून चालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 09:38 PM2022-03-06T21:38:03+5:302022-03-06T21:38:42+5:30

Crime News: नाशिक येथून ८० लाखाची विदेशी (रॉयल स्टॅग RS, IB नावाची ) दारू ट्रक क्र महा.22 एन 2555  नागपूर येथे नेत असताना चालकाने ट्रकातील २६ लाखाची दारू परस्पर विक्री करुन अफरातफर करण्यात आल्याची तक्रार कारंजा पोलिसात करण्यात आली आहे.

Crime News: 26 lakh foreign liquor scam in Wardha; Driver passing by the scene | Crime News :बापरे...वर्ध्यात २६ लाखाच्या विदेशी दारूची अफरातफर; घटनास्थळावरून चालक पसार

Crime News :बापरे...वर्ध्यात २६ लाखाच्या विदेशी दारूची अफरातफर; घटनास्थळावरून चालक पसार

googlenewsNext

वर्धा -  नाशिक येथून ८० लाखाची विदेशी (रॉयल स्टॅग RS, IB नावाची ) दारू ट्रक क्र महा.22 एन 2555  नागपूर येथे नेत असताना चालकाने ट्रकातील २६ लाखाची दारू परस्पर विक्री करुन अफरातफर करण्यात आल्याची तक्रार कारंजा पोलिसात करण्यात आली आहे.

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सावळी (खुर्द) शिवारात चालकाने रस्त्याच्या कडेला  ट्रक  नाल्यात घुसवून ट्रक सोडून चालक पसार झाला आहे. या ट्रकमध्ये विदेशी दारू असल्याने रात्रीच पोलिसांनी गस्त वाढवली होती.या ट्रकातील 400 विदेशी दारूचे बॉक्स गायब होते. ट्रक अपघातग्रस्त झाल्याने प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार नाशिक येथून एक हजार विदेशी दारूची बॉक्स भरुन नागपूर येथे गोडाऊनला आणण्यात येत होते, यादरम्यान चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक नाल्यात घुसवला आणि अपघात घडल्याचा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनातील  400 विदेशी दारूचे बॉक्स ट्रक मध्ये नसल्याने फिर्यादी राकेश गुजर यांनी कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत 26 लाखाची दारू परस्पर अफरातफर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणात ट्रक चालक सुरेश सरंधर घुले वय 37 रा. नाशिक यांच्या नावाने तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी चालक सुरेश घुले यांचा शोध कारंजा पोलीस घेत आहे. या प्रकरणात  पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन मानकर  व प्रदीप कुंभरे तपास करत आहे.

दारूच्या अफरातफरीत ट्रक घातले नाल्यात
ट्रक मधील दारूची अफरातफर करण्यात आली, त्यात ट्रकचा अपघात  घडवण्याचा प्रयत्न चालकाने केला असावा.घटनास्थळावरून दारू चोरी गेल्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न चालकाने केला.  नाशिकवरुन येताना दारूची चालकाने परस्पर विल्हेवाट लावून ट्रकचा अपघात घडवण्याचा प्रयत्न केल्याचा दिखावा करण्यात आला.

Web Title: Crime News: 26 lakh foreign liquor scam in Wardha; Driver passing by the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.