एक रुपयाचं ट्रान्झेक्शन अन् 30 लाखांची फसवणूक; लाखोंचा चुना लावणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 05:34 PM2022-02-03T17:34:56+5:302022-02-03T17:43:29+5:30

Crime News : भारतातील वेगवेगळ्या शहरातील १४ ज्वेलर्स आणि ३२ हॉटेल व्यावसायिकांची आरोपीने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

Crime News 30 lakh fraud by transacting one rupee; Young man arrested in thane | एक रुपयाचं ट्रान्झेक्शन अन् 30 लाखांची फसवणूक; लाखोंचा चुना लावणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला अटक

एक रुपयाचं ट्रान्झेक्शन अन् 30 लाखांची फसवणूक; लाखोंचा चुना लावणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला अटक

Next

रणजीत इंगळे 

फोन पे अ‍ॅपव्दारे देशभरातील १४ ज्वेलरी शॉपसह ३२ हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या एका उच्चशिक्षित आरोपीला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. फोन पेच्या माध्यमातून फोन पे ट्रान्झेक्शननुसार रक्कम न पाठविता फोन पे चे स्क्रिन शॉटमध्ये फेरफार करून ९७ लाख ३३० रुपये पेड केल्याचे भासवून ज्वेलरी खरेदीसाठी फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार समोर आली होती. भारतातील वेगवेगळ्या शहरातील १४ ज्वेलर्स आणि ३२ हॉटेल व्यावसायिकांची आरोपीने लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

पेमेंट करण्यासाठी त्याच्या बँक अकाऊंटवरून फोन पे अ‍ॅपचा वापर करायचा. नंतर दुकानाच्या फोन पे सुविधा असलेल्या लिंकवर अथवा क्यु आर कोडव्दारे पैसे ट्रान्फसर करीत असे. परंतु, त्याच्या बँक खात्यात शिल्लक नसल्यामुळे ट्रान्झेक्शन फेल असे दाखविले जायचे. संबंधित व्यवसायिकाला तत्काळ तो मेसेज न दाखविता त्यानंतर तो त्याच्या फोन पे ॲपमधील स्वतःच्या बैंक खात्यावरून त्याच्याच दुसऱ्या बँकेतील खात्यात पैसे पाठवायचा.

सुब्रम्हण्यम रामकृष्ण अय्यर असे आरोपी तरुणाचे नाव असून तो ३३ वर्षांचा आहे. हा सुब्रम्हण्यम उच्चशिक्षित असून त्याने त्याचे एमबीए आयटी चे शिक्षण घेतलेले आहे. सदर आरोपी हा बेरोजगार असून मुळचा छत्तीसगड विलासपूर येथील रहिवाशी असून त्याचे घर आईच्या पेन्शनवर चालत होते. मात्र आईचे निधन झाल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी सुब्रम्हण्यम हा कुठलेही काम करत नसल्याने त्याला घराबाहेर काढले होते. उदरनिर्वाह कसा करायचा आणि मौज मज्जा करण्यासाठी त्याने मोबाईल अ‍ॅपचा वापर करून ऑनलाईन पेमेंट द्वारे हॉटेल आणि ज्वेलर्स व्यवसायिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. 

मोठी ज्वेलर्सची दुकाने आणि मोठ्या हॉटेल्समध्ये ऑनलाईन पेमेंटचे ट्रान्झेक्शन झालेले मेसेज हे उशिरा येतात त्यामुळे अशा प्रकारच्या ऑनलाईन पेमेंटमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सध्या वाढ होत चालली आहे. त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडू नये यासाठी व्यावसायिकांनी झेलेल्या ट्रान्झेक्शनची हिस्टरी पाहून शहानिशा करण्याचे आवाहन  ठाणे परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी केला आहे.
 

Web Title: Crime News 30 lakh fraud by transacting one rupee; Young man arrested in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.