Crime News: विद्यार्थ्याच्या वडिलांच्या प्रेमात पडली सुंदर ट्युशन टिचर, लग्नासाठी लावला तगादा, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:23 PM2022-03-21T15:23:18+5:302022-03-21T15:25:37+5:30

Crime News : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील ततारपूर ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी मिळालेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाबाबत पोलिसांनी महत्त्वपूर्ण माहिती समोर आणली आहे. या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह फेकण्यात आल्याचे तपासास समोर आले.

Crime News: A beautiful tuition teacher fell in love with a student's father. | Crime News: विद्यार्थ्याच्या वडिलांच्या प्रेमात पडली सुंदर ट्युशन टिचर, लग्नासाठी लावला तगादा, अखेर...

Crime News: विद्यार्थ्याच्या वडिलांच्या प्रेमात पडली सुंदर ट्युशन टिचर, लग्नासाठी लावला तगादा, अखेर...

googlenewsNext

जयपूर - राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील ततारपूर ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी मिळालेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाबाबत पोलिसांनी महत्त्वपूर्ण माहिती समोर आणली आहे. या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह फेकण्यात आल्याचे तपासास समोर आले. ही हत्या अनैतिक संबंध आणि ब्लॅकमेलिंगमुळे करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोणीमध्ये ज्या महिलेचा मृतदेह सापडला ती पेशाने ट्युशन टिचर होती. तिचे एका व्यावसायिकासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांमुळे सदर महिला व्यावसायिकावर लग्नासाठी आणि ५० लाख रुपये देण्यासाठी दबाव आणत होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने पत्नी आणि अन्य दोघांसह मिळून या महिलेची हत्या केली. तसेच तिचा मृतदेह फेकून दिला. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १६ मार्च रोजी ततारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुलाखाली एका गोणीमध्ये मृतदेह सापडल्याची खबर मिळाली होती. त्याआधारावर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एका पांढऱ्या प्लॅस्टिकच्या गोणीत महिलेचा मृतदेह सापडला. महिलेचा मृतदेह चार-पाच दिवस जुना होता. दरम्यान, तपासामध्ये सदर मृत महिलेची ओखळ प्रियंका (२९) अशी पटली. तसेच ती दिल्लीतील रहिवासी असल्याचेही समोर आले. ती ट्युशन टिचर म्हणून काम करायची आणि दिल्लीतील व्यावसायिक कपिल गुप्ता यांच्या घरी मुलांना शिकवायला जायची, अशी माहिती समोर आली. कपिल गुप्ता हे कपडा व्यापारी असून, त्यांची प्रियंकाशी मैत्री झाली. त्यानंतर ते त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले.  

Web Title: Crime News: A beautiful tuition teacher fell in love with a student's father.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.