Crime News: निर्जनस्थळी आढळला कारसह जळालेला मृतदेह, इगतपुरी तालुक्यातील घटना,अपघात की घातपात?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 06:26 AM2022-08-31T06:26:27+5:302022-08-31T06:26:57+5:30

Crime News: इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेवाडी शिवारात सोमवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात कार जळाली असून त्यामध्ये एक व्यक्तीही पूर्णपणे जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली आहे.

Crime News: A burnt body with a car found in a deserted place, incident in Igatpuri taluk, accident or mishap? | Crime News: निर्जनस्थळी आढळला कारसह जळालेला मृतदेह, इगतपुरी तालुक्यातील घटना,अपघात की घातपात?

Crime News: निर्जनस्थळी आढळला कारसह जळालेला मृतदेह, इगतपुरी तालुक्यातील घटना,अपघात की घातपात?

Next

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेवाडी शिवारात सोमवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात कार जळाली असून त्यामध्ये एक व्यक्तीही पूर्णपणे जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली आहे. मंगळवारी सकाळी घोटी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळालेली कार ही बिनानंबरची असून, त्यांतील एक व्यक्ती जळून खाक झाली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे . ही घातपाताची घटना आहे की अपघात याबाबत सर्वत्र चर्चा सुरू असून जळालेली व्यक्ती कोण, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य परिसर असलेल्या भावली धरणाच्या परिसरात आंबेवाडीच्या दोन किलोमीटर अलीकडे रस्त्यावर एक कार मंगळवारी जळालेल्या अवस्थेत मिळाली. त्यात एक व्यक्ती पूर्णपणे जळून गेलेली असल्याचेही आढळून आले. जळालेला मृतदेह पुरुषाचा की स्त्रीचा याबाबत परिसरामध्ये चर्चा सुरू आहे. पोलिसांनी हा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला असून, फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून तो कोणाचा, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दि. २९ च्या मध्यरात्री आंबेवाडी शिवारात एका निर्जनस्थळी ही घटना घडली. यामध्ये सदरची कार पूर्णपणे जळून गेली असून त्यामध्ये कोळसा झालेला एक मृतदेहही आढळून आला. याबाबत सकाळीच घोटी पोलिसांना खबर देण्यात आली. त्यानंतर लगेचच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्याने पंचनामा केला. या कारमधील जळालेला मृतदेह कोणाचा आहे, याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

याबाबत घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर उपनिरीक्षक संजय कवडे यांच्यासह पोलीस पथकाने परिसरात सदर घटनेबाबत चौकशी केली. मात्र कोणताही सुगावा मिळू शकला नाही. या जागेवरील परिस्थिती पाहता, ही घटना घातपाताची असल्याचा कयास वर्तविला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण इगतपुरी तालुका हादरला आहे. घटनेच्या तपासासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे.

डॉ. वाजे प्रकरणाची झाली आठवण
दि. २६ जानेवारी रोजी इगतपुरी तालुक्यातील घोटी शिवारामध्ये एका जळालेल्या कारमध्ये मानवी मृतदेह संपूर्ण कोळसा झालेल्या स्थितीमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी याबाबतचा तपास केल्यानंतर ही कार आणि त्यामधील मृतदेह हा नाशिक महापालिकेच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेच्या ए्क दिवस आधीच त्यांच्या पतीने त्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. फॉरेन्सिक रिपोर्टमधून हा मृतदेह डॉ. वाजे यांचा असल्याचे स्पष्ट झाले होते. कालांतराने त्यांच्या पतीनेच खून करून डॉ. वाजे यांचा मृतदेह कारसह जाळून टाकल्याचे समोर आले. या घटनेमध्येही काहीसा असाच प्रकार असल्याने नागरिकांना डॉ. वाजे प्रकरणाची आठवण झाली आहे.

 

Web Title: Crime News: A burnt body with a car found in a deserted place, incident in Igatpuri taluk, accident or mishap?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.