Crime News: सातव्या मजल्यावरील घरात प्रवेश करत साडेबारा लाखांची घरफोडी, गोरेगावमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 08:18 AM2022-02-02T08:18:08+5:302022-02-02T08:19:03+5:30

Crime News: ‘स्पायडरमॅन’सारखे इमारतीवर चढून एका चोराने सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून प्रवेश करत ग्राफिक डिझायरच्या घरातील साडेबारा लाखांच्या ऐवजावर हातसाफ केल्याची घटना सोमवारी घडली आहे.

Crime News: A robbery of Rs 12.5 lakh by entering a house on the seventh floor | Crime News: सातव्या मजल्यावरील घरात प्रवेश करत साडेबारा लाखांची घरफोडी, गोरेगावमधील प्रकार

Crime News: सातव्या मजल्यावरील घरात प्रवेश करत साडेबारा लाखांची घरफोडी, गोरेगावमधील प्रकार

Next

- मनीषा म्हात्रे 
मुंबई :  ‘स्पायडरमॅन’सारखे इमारतीवर चढून एका चोराने सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून प्रवेश करत ग्राफिक डिझायरच्या घरातील साडेबारा लाखांच्या ऐवजावर हातसाफ केल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवून बांगुरनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
गोरेगाव येथील पोलोरेज टॉवरच्या सातव्या मजल्यावर ही फिल्मी स्टाईल घरफोडी झाली आहे. ग्राफिक डिझायनर असलेल्या रितू मानधना (२७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. मानधना यांच्या तक्रारीनुसार, २९ जानेवारी रोजी घर लॉक करून गावी गेलेले हे दाम्पत्य सोमवारी दुपारी घरी परतले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतून लॉक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बाहेरून लॉक उघडणाऱ्याला बोलावून दरवाजा उघडला.  घरात प्रवेश करताच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसले. तसेच बेडरूममधील कपाटातून दागिने चोरी झाले होते. 
अखेर मानधना यांनी बांगुरनगर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली. सोन्याचे हिरेजडित २० ते २५ तोळे दागिने, दीड लाख किमतीची महागडी घड्याळे, दोन लाखांची रोकड तसेच प्रोजेक्टरसह साडेबारा लाखांचा ऐवज यात चोरीला गेला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
बांगुरनगर पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवत इमारतीच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याचे बांगुरनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी सांगितले.
 

Web Title: Crime News: A robbery of Rs 12.5 lakh by entering a house on the seventh floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.