Crime News: शेजारणीच्या घरी गेलेला तरुण बराच वेळ बाहेर आला नाही, लोकांनी दरवाजा तोडून पाहिल्यावर दिसले धक्कादायक चित्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:39 AM2022-02-10T10:39:12+5:302022-02-10T10:39:57+5:30
Crime News: झारखंडची राजधानी रांचीमधील खेलगाव ठाण्याच्या हद्दीमध्ये एका खोलीतून तरुण आणि तरुणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेले होते.
रांची - झारखंडची राजधानी रांचीमधील खेलगाव ठाण्याच्या हद्दीमध्ये एका खोलीतून तरुण आणि तरुणीचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेले होते. दोघांचे मृतदेह दिसल्यावर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले, तसेच तपासाला सुरुवात केली. दरम्यान, आत्महत्येमागे कुठला वाद होता की काही अन्य काही कारण होते, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
ही धक्कादायक घटना खेलगाव पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. या परिसरात राहणारा आशिष (२२) आणि त्याची शेजारीण असलेल्या निशू कुमारी ऊर्फ गुडिया (२०) यांचे मृतदेह खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत सापडले. कुटुंबीयांनी जेव्हा तरुणीच्या खोलीचा दरवाजा बंद दिसला, तेव्हा आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर दरवाजा तोडला असता जे दिसले ते पाहून तेथे उपस्थित असलेल्यांना धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पुढील कारवाई सुरू केली.
पोलीस तपासामध्ये आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार आशिष आणि शेजारील युवती हे एकमेकांचे शेजारी होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र आत्महत्येचे कारण काय होते हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, खेलगाव ठाण्याचे प्रभारी मनोज महतो यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी आणि तपास सुरू आहे. दरम्यान, स्थानिक आणि नातेवाईकांकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, पोस्टमार्टेमच्या रिपोर्टनंतरच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्या आशिष हा शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या घरात जाताना दिसला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही. तसेच तरुणीच्या खोलीचा दरवाजाही उघडला नाही. तेव्हा लोकांनी दरवाजा तोडला. तेव्हा हे दोघेही गळफास घेतलेल्या स्थितील लटकलेल्या स्थितीत दिसले.