Crime News : एकाच वेळी दोन तरुणांना डेट करत होती तरुणी, अखेर बिंगं फुटलं आणि एकाने दुसऱ्या तरुणावर चालवली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 02:39 PM2022-02-26T14:39:50+5:302022-02-26T14:40:23+5:30

Crime News: कथितपणे प्रेमाच्या त्रिकोणातून एका व्यक्तीवर गोळीबार करून त्याला जखमी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

Crime News: A young woman was dating two young men at the same time, finally Bing exploded and one shot at another | Crime News : एकाच वेळी दोन तरुणांना डेट करत होती तरुणी, अखेर बिंगं फुटलं आणि एकाने दुसऱ्या तरुणावर चालवली गोळी

Crime News : एकाच वेळी दोन तरुणांना डेट करत होती तरुणी, अखेर बिंगं फुटलं आणि एकाने दुसऱ्या तरुणावर चालवली गोळी

Next

नवी दिल्ली - प्रेमप्रकरणातील फसवणुकीतून जन्माला येणाऱ्या नात्यांचा शेवट हा अनेकदा फार भयानक होतो. अशीच एक घटना पश्चिम दिल्लीत घडली आहे. येथील राजा गार्डन परिसरामध्ये कथितपणे प्रेमाच्या त्रिकोणातून एका व्यक्तीवर गोळीबार करून त्याला जखमी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास रिंग रोडवर स्थित राजा गार्डन गुरुद्वाराजवळ गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती. अतिरिक्त पोलीस उपायुकत (पश्चिम) प्रशांत गौतम यांनी सांगतले की, या घटनेदरम्यान, हरिनगर यथील सतविंदरच्या पायात गोळी लागली. तर रोहितच्या हाताला खरचटले होते.

प्रशांत गौतम यांनी सांगतले की, घटनास्थळावरून जामियानगरच्या दाऊदला एका देशी पिस्तुलासह अटक करण्यात आली. तसेच सतविंदरने दिलेल्या जबाबाच्या आधाकावर राजौरी गार्डन पोलीस ठाण्यात कलम ३०७ न्वये तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशीमध्ये समजले की, दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या भांडणाचे कारण एक महिला होती. ती कथितपणे या दोघांबरोबरही डेटिंग करत होती. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेमध्ये संबंधित असलेले दोन आरोपी फहद आणि दीपांशू हे फरार आहेत. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

Web Title: Crime News: A young woman was dating two young men at the same time, finally Bing exploded and one shot at another

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.