भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनाची परस्पर विक्री करुन फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक, कासारवडवली पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 06:27 PM2022-06-12T18:27:34+5:302022-06-12T18:28:00+5:30
Crime News: भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनाची परस्पर विक्री करुन रवींद्र कोळेकर या वाहन मालकाची फसवणूक करणाºया नितेश पाटील (३०, रा. ओवळा, ठाणे ) याला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
ठाणे - भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनाची परस्पर विक्री करुन रवींद्र कोळेकर या वाहन मालकाची फसवणूक करणाºया नितेश पाटील (३०, रा. ओवळा, ठाणे ) याला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख ७० हजारांची मोटारकारही हस्तगत केल्याची माहिती वागळे इस्टेट प िरमं डळाचे प्रभारी पाेलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रविवारी दिली.
ओवळा येथील रहिवाशी असलेल्या नितेश पाटील आणि त्याचा भाऊ गगन पाटील यांनी मे २०२२ मध्ये कासारवडवली भागात राहणारे रवींद्र कोळेकर (रा. डोंगरीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे) यांच्या मालकीची मोटारकार चार दिवसांसाठी भाडे तत्वावर घेतली होती. त्यांनी मोटारकार घेऊन गेल्यानंतर ती त्यांना परत न करता त्यांची फसवणूक केली. वारंवार पाठपुरावा करुनही आपली गाडी परत न मिळाल्याने कोळेकर यांनी याप्रकरणी १० जून २०२२ रोजी फसवणूकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. यातील आरोपी हे समोर येत नसल्यामुळे पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला होता.
अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, योगेश आव्हाड आणि शशीकांत रोकडे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंके, हवालदार व्ही. एस. पाटील, आर. एस. चौधरी, पी. आर. तायडे आणि आर. एस. महापुरे आदींच्या पथकाने आरोपीच्या मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे कौशल्यपूर्ण तांत्रिककदृष्टया तपास करुन खबºयांच्या संपर्कातून नितेश पाटील याची अचूक माहिती मिळवली. त्यानंतर त्याला १० जून रोजी अटक केली. सखोल चौकशीमध्ये भाडेतत्वावर घेतलेली मोटारकार त्याने परस्पर विक्री केल्याची कबूली दिली. राबोडी भागातून ही एक लाख ७० हजारांची मोटार कार अवघ्या पाच तासांमध्ये पोलिसांनी हस्तगत केली.