Crime News: पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडायची अभिनेत्री, असा झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:05 PM2022-08-22T19:05:34+5:302022-08-22T19:06:08+5:30
Crime News: झारखंडमधील पलामू जिल्ह्यात पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडणाऱ्या एका फिल्मी अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ट्रकचालकांच्या लुटीच्या काही घटना घडल्या होत्या.
रांची - झारखंडमधील पलामू जिल्ह्यात पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडणाऱ्या एका फिल्मी अभिनेत्रीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ट्रकचालकांच्या लुटीच्या काही घटना घडल्या होत्या. तसेच त्याबाबतच्या काही तक्रारीदेखील आल्या होत्या. दरम्यान, एका टोळीच्या माध्यमातून लुटपाट करणारी ही अभिनेत्री नाट्यमयरीत्या जाळ्यात अडकली.
त्याचे झाले असे की, सुस्मिता देवांगन आपले ट्रक बिलासपूरमधील ट्रान्सपोर्ट देवेंद्र यादव यांच्या माध्यमातून चालवायच्या. चालकाने ट्रक पकडल्याची माहिती ट्रान्सपोर्टरांना दिली. तसेच त्यांच्याशी बोलणंही करून दिलं. यादरम्यान, काही कथित पोलीस कर्मचारी आणि मायनिंग ऑफिसर ट्रक जप्त करून कोळजा ताब्यात घेण्याची धमकी देऊ लागले. दरम्यान, ट्रान्सपोर्टर तिथे पोहोचले तेव्हा मायनिंग ऑफिसर आणि पोलीस तीन वेगवेगळ्या कारमध्ये दिसले. दरम्यान, ट्रान्सपोर्टर त्यांना पकडण्याच्या इराद्यानेच तिथे पोहोचला होता. ट्रान्सपोर्टरला पाहून कारमधील हे कथित पोलीस तरुण पसार झाले. या प्रकरणात पोलिसांची भूमिका काहीशी बेफिकीरीची राहिली. दरम्यान, या प्रकरणात छत्तीसगडी चित्रपटांमध्ये काम करणारी एक तरुणी जाळ्यात सापडली. मात्र पोलिसांनी चौकशी करून तिला सोडून दिले.
दरम्यान, या प्रकरणात तक्रार झाल्यानंतर कारमालक गायत्री पाटले कोनी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी पोलिसांना सांगितले की, कार घेऊन गेलेले त्यांचे पती आतापर्यंत घरी पोहोचलेले नाहीत. त्यानंतर एसएसपी पारुल माथूर यांच्या आदेशाने लुटीची केस दाखल झाली.
या प्रकरणात संबंधित महिलेची चौकशी सुरू झाली तेव्हा तिने ती छत्तीसगडी अल्बममध्ये काम करते आणि अल्बममध्ये पोलिसाची भूमिका करते असे सांगितले. दरम्यान, तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसही तिची वर्दी पाहून कारवाई करण्यात कचरत होते. मात्र पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. चौकशीमध्ये शिवशंकर नावाच्या ड्रायव्हरने सांगितले की, गायत्री ही स्वत: पोलीस कर्मचारी असल्याचा दावा करते. तसेच लुटारूंच्या टोळीमध्ये तिचाही सहभाग आहे. त्यानंतर पोलिसांनी चालक शिवशंकर याच्यासह गायत्री हिला अटक केले. आता या टोळीतील तीन सदस्यांचा शोध पोलीस घेत आहेत.