भयंकर! हात विजेच्या तारेनं बांधले, झाडूने केला स्विच ऑन; विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 11:35 AM2022-08-29T11:35:24+5:302022-08-29T11:42:31+5:30

विद्यार्थ्याने आपले दोन्ही हात विजेच्या तारेने बांधले. त्यानंतर तारेचं दुसरं टोक प्लगमध्ये घातलं आणि झाडून स्विच ऑन केला.

Crime News admission in b pharma student electric current wire bhopal | भयंकर! हात विजेच्या तारेनं बांधले, झाडूने केला स्विच ऑन; विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ

फोटो - झी न्यूज

Next

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. आत्महत्येसाठी त्याने अतिशय वेदनादायी पद्धत निवडून आयुष्याचा शेवट केला. विद्यार्थ्याने आपले दोन्ही हात विजेच्या तारेने बांधले. त्यानंतर तारेचं दुसरं टोक प्लगमध्ये घातलं आणि झाडून स्विच ऑन केला. शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप असं मृत तरुणाचं नाव असून तो 20 वर्षांचा होता. काही दिवसांपूर्वीच त्याने बी-फार्ममध्ये प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केली होती. सोमवारी त्याचं एडमिशन होणार होतं. 26 ऑगस्टला कुलदीपचा वडिलांशी संवाद झाला होता अशी माहिती कुटुंबियांनी दिली. सगळं काही व्यवस्थित असल्याचं कुलदीपने वडिलांना सांगितलं होतं.शनिवारी सकाळी वडिलांनी कुलदीपला फोन केला. मात्र त्याचा फोन स्विच ऑफ होता. त्यामुळे वडिलांनी कुलदीपच्या घरमालकाला कॉल केला. आपण कामावर असून घरी जाऊन बघतो, असं घरमालकानं सांगितलं. 

"हात विजेच्या तारेनं बांधलेले"

संध्याकाळी घरमालक कुलदीपच्या खोलीबाहेर पोहोचले. दरवाजा आतून बंद होता. अनेकदा आवाज दिल्यानंतरही कुलदीपने दरवाजा न उघडल्याने घरमालकानं पोलिसांना बोलावलं. कुलदीप सिहोर जिल्ह्यातील बिलकिसगंजचा रहिवासी होता. सध्या तो भोपाळमधील नीलबड परिसरात भाड्यानं राहात होता. कुलदीप खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती शनिवारी संध्याकाळी सात वाजता पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी त्यांना कुलदीप मृतावस्थेत आढळून आला. त्याचे हात विजेच्या तारेनं बांधलेले होते.

कुलदीपच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का

कुलदीपने आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्यार्थ्याच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्याने आधी स्वत:चे दोन्ही हात बांधले. त्यानंतर तारेचं दुसरं टोक प्लगमध्ये टाकून स्विच ऑन केला. त्यामुळे करंट लागून कुलदीपचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुलदीपच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. परिसरात खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News admission in b pharma student electric current wire bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.