बाबो! चोरांनी लढवली अनोखी शक्कल; धक्काही न लावता ATM मधून लुटले तब्बल 35 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 07:10 PM2021-06-22T19:10:05+5:302021-06-22T19:18:13+5:30

Crime News : एटीएमला धक्काही न लावता तब्बल 35 लाख लुटल्याची धक्कादायक समोर आली आहे.

Crime News after atms fraudsters target cash deposit machines in chennai | बाबो! चोरांनी लढवली अनोखी शक्कल; धक्काही न लावता ATM मधून लुटले तब्बल 35 लाख

बाबो! चोरांनी लढवली अनोखी शक्कल; धक्काही न लावता ATM मधून लुटले तब्बल 35 लाख

Next

नवी दिल्ली - चोरीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. चेन्नईमध्ये चोरांनी अनोखी शक्कल लढवली आहे. एटीएमला धक्काही न लावता तब्बल 35 लाख लुटल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसही हैराण झाले आहेत. चोरांनी चेन्नईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या एटीएममधील डिपॉझिट मशीनमधून अत्यंत हुशारीने 35 लाखांहून अधिक रोख रक्कम चोरून नेली. पैसे बाहेर येताच चोराने मशीनमध्ये आपले बोट अडकवले, त्यामुळे कॅश काढण्याचे सेक्शन काम करत नव्हते आणि जाग्यावर थांबले.

चोरांनी एटीएम कार्ड टाकून 10 हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. पैसे बाहेर येताच त्यानंतर त्यांनी अनेकदा पैसे काढले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरीची नवीन पद्धत घडली. पोलिसांना या चोरांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे. सेनॉय नगर येथील एसबीआय बँकेच्या शाखेचे व्यवस्थापक विरुगमबक्कम पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चोर एटीएममध्ये जाऊन पैसे काढत होते. व्यवहार झाल्यानंतर एटीएममधून पैसे निघत असताना चोर पैसे निघणाऱ्या जागेवर बोट ठेवत होते. 

इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने व्यवहार रद्द होतं असत. त्यानंतर चोर पैसे काढत होते. अशी प्रक्रिया चोर पुन्हा पुन्हा करत होते. चोरीची ही नवीन पद्धत उघडकीस आल्यानंतर एसबीआय बँकेच्या अनेक शाखांच्या व्यवस्थापकांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. रामपुरम-वल्लुवर रोड, वेलचेरी- विजयनगर, तारामणी, पेरियामेदू येथे एटीएम चोरीची घटना समोर आली आहे. अनेक एटीएममधून चोरांनी 35 लाख रुपये चोरले आहेत. लोक अनेकदा डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करतात. मात्र, यातून रोख रक्कमही काढता येते हे फार कमी लोकांना माहीत असते. या माहितीचा फायदा घेत चोरांनी चोरी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून जोरदार राडा; मंडपातच पडला रक्ताचा सडा अन्...

हैदराबादमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. तसेच मंडपातच रक्ताचा सडा पडला. नाव न छापण्यावरून सुरू झालेला वाद शेवटी टोकाला गेला आणि एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तुकारामगेट परिसरातल्या आझाद चंद्रशेखर नगरमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे शेखर (24) आणि सर्वेश (20) या दोघा आरोपींनी हे कृत्य केलं. 16 जून रोजी त्यांच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं. लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत सर्व मंडळींची नावं होती. मात्र शेखर आणि सर्वेश यांच्या आई-वडिलांची नावं त्यात नव्हती. त्याचा राग शेखर आणि सर्वेश यांच्या मनात होता. त्यावरून त्यांचं आणि यादगिरी नावाच्या त्यांच्या एका नातेवाईकाचं भांडण झालं. या दोघा आरोपींनी यादगिरीच्या पत्नीमुळे आपल्या आई-वडिलांची नावं छापली गेली नसल्याचा आरोप केला आणि वाद झाला. 

Web Title: Crime News after atms fraudsters target cash deposit machines in chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.