अमेरिका पुन्हा हादरली! अल्बामाच्या चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:54 AM2022-06-17T08:54:38+5:302022-06-17T09:02:04+5:30

America Saint Stephens Episcopal Church : अल्बामामधील वेस्टाविया हिल्स (Vastavia Hills) सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये गुरूवारी संध्याकाळी गोळीबार करण्यात आला आहे.

Crime News america multiple people were shot at alabama church shooting suspect taken into custody | अमेरिका पुन्हा हादरली! अल्बामाच्या चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

फोटो - सोशल मीडिया

googlenewsNext

अमेरिका पुन्हा एकदा हादरली असून गोळीबाराची आणखी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. अल्बामामधील वेस्टाविया हिल्स (Vastavia Hills) सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये (Saint Stephens Episcopal Church) गुरूवारी संध्याकाळी गोळीबार करण्यात आला आहे. न्यूज एजन्सी AFP नं हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

वेस्ताविया हिल्स पोलीस विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी संध्याकाळी जवळपास 6.30 वाजता 3775 क्रॉसहेव ड्राइव्ह भागात गोळीबाराची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. येथील चर्चमधील अनेकांना गोळी लागली आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात अनेकांना गोळी लागली आहे. या गोळीबारातील जखमींची नेमकी संख्या पोलिसांनी अद्याप सांगितलेली नाही. या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणात अधिक चौकशीनंतर पुढील माहिती देण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

4 महिन्यांत 212 घटना

अमेरिकेतील स्वतंत्र डेटा संग्रह करणाऱ्या 'गन व्हॉयलन्स अर्काइव्ह'च्या रिपोर्टनुसार गेल्या 4 महिन्यात 212 सामूहिक गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. 2021 मध्ये 693 सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. 2022 मध्ये आत्तापर्यंत 611 ठिकाणी गोळीबार झाला आहे. तर 2019 मध्ये 417 ठिकाणी या प्रकराच्या घटना घडल्या होत्या.

अमेरिकेत गेल्या महिन्यात सामूहिक गोळीबाराच्या झालेल्या घटनेनंतर देशातील गन कल्चरवर (Gun Culture in America) बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात सिनेटमध्ये कायद्यातील बदलाच्या प्रस्तावाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या उपायानुसार 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला बंदूक खरेदी करायची असल्यास त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. तसंच अवैध पद्धतीनं बंदूक खरेदीवर बंदी घालण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News america multiple people were shot at alabama church shooting suspect taken into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.