बाबो! पत्नीच्या हत्येप्रकरणी पती जेलमध्ये गेला अन् 'ती' 12 वर्षांनी प्रियकराच्या घरी जिवंत सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:55 PM2023-01-24T12:55:38+5:302023-01-24T12:59:24+5:30

ज्या पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला तुरुंगात राहावे लागले, ती पत्नी तब्बल 12 वर्षांनंतर अचानक भेटली.

Crime News amethi husband wife murder case found at lovers house | बाबो! पत्नीच्या हत्येप्रकरणी पती जेलमध्ये गेला अन् 'ती' 12 वर्षांनी प्रियकराच्या घरी जिवंत सापडली

बाबो! पत्नीच्या हत्येप्रकरणी पती जेलमध्ये गेला अन् 'ती' 12 वर्षांनी प्रियकराच्या घरी जिवंत सापडली

googlenewsNext

अमेठीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीला कोणताही गुन्हा न करता तुरुंगवास भोगावा लागला. ज्या पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला तुरुंगात राहावे लागले, ती पत्नी तब्बल 12 वर्षांनंतर अचानक भेटली. रायबरेली जिल्ह्यातून पतीला पत्नी सापडली. त्यामुळे आता त्याचे कुटुंबीय याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी करत आहेत. हे संपूर्ण प्रकरण अमेठी जिल्ह्यातील जायस पोलीस ठाण्याच्या अली नगर भागातील आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज कुमार वर्मा पत्नी सीमा वर्मासोबत राहत होते. 25 मार्च 2011 रोजी तरुणाची पत्नी सीमा वर्मा अचानक गायब झाली. खूप शोध घेऊनही पत्नी सापडली नाही. मनोजच्या सासरच्यांनी सीमा वर्माचा पती मनोज वर्माविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्याच्यावर स्वत:च्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मनोजला 11 दिवस तुरुंगवास भोगावा लागला.

कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर मनोज सतत त्याच्या पत्नीचा शोध घेत होता. यासोबतच या प्रकरणाबाबत ते न्यायालयाच्या चकरा मारत होते. त्याचवेळी 11 वर्षांनंतर 10 जानेवारी 2023 रोजी मनोजला त्याची पत्नी जिवंत असल्याची माहिती मिळाली. मनोजने याबाबत चौकशी केली असता त्याला समजले की, त्याची पत्नी आपल्या तीन मुलांसह तिच्या प्रियकराच्या घरी राहते. त्यानंतर मनोजने रायबरेली जिल्ह्यातील भडोखर पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पत्नीचे जबाब घेऊन अन्य कायदेशीर कारवाई केली.

पीडितेचा पती मनोजने सांगितले की, त्यांची पत्नी सीमा ही रायबरेली येथील रहिवासी असून, 12 वर्षांपूर्वी एका व्यक्तीसोबत पळून गेली आणि तिचे लग्न झाले. हे माहीत असतानाही त्यांच्या कुटुंबीयांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला. आम्हाला निर्दोष सिद्ध करता यावे यासाठी पत्नीने न्यायालयात हजर व्हावे, अशी आमची इच्छा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Crime News amethi husband wife murder case found at lovers house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.