Crime News: संतप्त जमावाने पोलीस ठाण्याला लावली आग, धक्कादायक कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 10:44 PM2022-05-21T22:44:18+5:302022-05-21T22:44:41+5:30
Crime News: आसाममध्ये पोलिसांच्या कोठडीत एका व्यक्तीचा कथितपणे मृत्यू झाल्यानंतर जमावाने पोलीस ठाण्याला आग लावल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार नगांव जिल्ह्यातील बटाद्रवा येथे घडला.
गुवाहाटी - आसाममध्येपोलिसांच्या कोठडीत एका व्यक्तीचा कथितपणे मृत्यू झाल्यानंतर जमावाने पोलीस ठाण्याला आग लावल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार नगांव जिल्ह्यातील बटाद्रवा येथे घडला. येथे संतप्त जमावाने आज पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली. त्यानंतर पोलीस ठाण्याला आग लावली. यात संपूर्ण पोलीस ठाणे जळून गेले.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नगावच्या एसपी लीना डोले यांनी सांगितले की, आम्ही आरोपांचा तपास करत आहोत, तसेच ठाण्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आग आणि हल्ल्याच्या या घटनेत २ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.
Assam | Mob set Batadrava Police Station on fire in Nagaon district after man allegedly died in police custody
— ANI (@ANI) May 21, 2022
We're investigating the allegations. 3 have been detained from among persons who attacked police station. 2 police personnel have been injured in attack: SP Leena Doley pic.twitter.com/7kwCCYwB0s