धक्कादायक! बर्थडे पार्टीला दारु कमी पडली, तीन तरुणांनी मित्राला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 08:59 AM2024-07-03T08:59:07+5:302024-07-03T09:07:36+5:30

Crime News: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्थडे पार्टीला दारु कमी पडल्यामुळे मित्रालाच चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले आहे.

crime news At a birthday party drunk, three young men throw a friend from the fourth floor | धक्कादायक! बर्थडे पार्टीला दारु कमी पडली, तीन तरुणांनी मित्राला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले

धक्कादायक! बर्थडे पार्टीला दारु कमी पडली, तीन तरुणांनी मित्राला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले

Crime News: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळच्या मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येच कारणही किरकोळ आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बर्थडे पार्टीत दारू न मिळाल्याने तीन तरुणांनी आपल्याच मित्राला इमारतीवरून फेकून दिल्याचे वृत्त आहे. सध्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी पकडले असून खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई सुरू आहे.

नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ जून रोजी चिंचपाडा येथे घडली. मृत कार्तिक वायाळ याने नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव या तीन मित्रांना वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते. ते तिघेही रात्री उशीरपर्यंत दारु पित बसले होते. दारूसोबत संभाषण सुरूच होते आणि रात्री उशिरा दारू संपली तेव्हा दारूच्या कमतरतेवरून चार मद्यधुंद मित्रांमध्ये भांडण सुरू झाले.

यावेळी कार्तिक याला अपमानास्पद वाटल्याने त्याने दारूची बाटली उचलून नीलेशच्या डोक्यात मारली. या मारहाणीचा डोक्यात राग धरुन निलेश याने अन्य दोघांसह कट रचला. त्या तिघांनीही कार्तिक राहत असलेल्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. यानंतर त्यांनी त्याला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. यामुळे कार्तिक गंभीर जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल केला परंतु त्याचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

मोबाईल मध्ये अभ्यास करण्या ऐवजी मुलगा गेम खेळत असल्याचे पाहून आई ने अभ्यास कर म्हटले म्हणून १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली . भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील गणेश देवल नगरच्या क्रांती नगर रेश्मा इद्रिस बानो यांचा १५ वर्षांचा मुलगा सैफ हा अभ्यास करण्या ऐवजी मोबाईल वर गेम खेळत बसला होता . त्यावेळी आईने त्याला मोबाईल वर गेम न खेळता अभ्यास कर असे सांगितले .  त्याचा सैफ ह्याला राग आला आणि त्याने २९ जूनच्या सायंकाळी घरातच गळफास घेतला . त्याला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले .

या प्रकरणी आई रेश्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार भाईंदर पोलिसांनी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . 

Web Title: crime news At a birthday party drunk, three young men throw a friend from the fourth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.